कृष्णा नदीची पाणीपातळी ५ फुटाने वाढली | सांगली भरपूर बातम्या वाचा एका क्लिकवर…

0
20
सांगली ः कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारीही अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून दिवसभरात पाच फुटाने पाणी वाढले. कृष्णा आणि वारणा नदीवरील बंधारेही पाण्याखाली गेले. पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास वारणा नदीकाठावर पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. दरम्यान जिल्ह्यात शिराळा तालुका वगळता अन्यत्र पावसाने उघडीप दिली.सोमवार सायंकाळनंतर सांगलीत आयर्विन पुलावर कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटाच्या पुढे गेली.

गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरु असलेला पाऊस सोमवारीही सुरुच राहिला. चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासात चोवीस तासात 132 मि.मी पाऊस झाला. धरणाचा पाणीसाठा 19.90 टीएमसी झाला आहे. वारणा नदीवरील बंधारे चार दिवसांपासून पाण्याखाली गेले आहेत. पाऊस सुरुच राहिल्यास नदीची पाणीपातळी वाढतच असून वारणा काठावर पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत दिवसभरात पाच फुटाने वाढ झाली. नदीकाठावरील बहुतांशी पिके पाण्याखाली गेली आहेत.
वारणा नदीवरील येळापूर-वाकुर्डे हा पूल पाण्याखाली गेला आहे, याशिवाय काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा नदीवरील बोरगाव, नागठाणे, मौजे डिग्रज हे बंधारे पाण्याखाली गेले. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असून तेथे 184 मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणात 41.40 टीएमसी पाणीसाठा आहे, त्याचे प्रमाण 40 टक्के आहे. महाबळेश्‍वरमध्ये 99 तर नवजा येथे 274 मि.मी पाऊस झाला. कर्नाटकमधील अलमट्टी धरणात 91.66 टीएमसी पाणीसाठा आहे. अलमट्टीमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने 15 हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. शिराळा तालुक्यात दमदार पाऊस सुरुच राहिला. पलूस, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, जत तालुक्यात पावसाने उसंत घेतली. खरीप पेरण्यासाठी कमी कालावधी असल्याने बहुतांशी भागात पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात 39.5 मि.मी पाऊस
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 39.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून वाळवा-इस्लामपूर तालुक्यात सर्वाधिक 71.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मिरज 40.7 (295.4), जत 4.5 (248.5), खानापूर-विटा 29.5 (254.4), वाळवा-इस्लामपूर 71.1 (391), तासगाव 34.5 (312), शिराळा 58.3 (495), आटपाडी 5.4 (222.1), कवठेमहांकाळ 28.9 (324.2), पलूस 52.7 (285.6), कडेगाव 38.3 (296.9).
———–

सांगली ः जुना बुधगावरोड पंचशिलनगर येथिल रेल्वे पुलाच्या बांधकामामुळे लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या अशी सुचना माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना केली.जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसेही यावेळी उपस्थित होत्या. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी त्या ठिकाणची परिस्थिती व संभाव्य अडचणी जिल्हाधिकार्‍यांसमोर मांडल्या.

जुना बुधगाव रोड पंचशीलनगर रेल्वे गेट संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय  बजाज  जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेत  जुना बुधगाव रोड पंचशीलनगर  रेल्वे गेटबाबत  समस्या मांडल्या.
श्री बजाज यांनी यावेळी सांगितले, चिंतामणनगरचा पूल पूर्ण कार्यक्षमतेने सुरु झाल्याशिवाय पंचशीलनगरचा पूल बांधण्यास घेऊ नये अशी सर्वांचीच मागणी आहे. मात्र हे काम सुरू करताना त्याचा विचार करताना दिसला नाही.  वाहतूक कोंडी मुळे रेल्वे गेटच्या दुतर्फा एकेक किलोमीटर  रांगा  लागतात.त्यामुळे  नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. रेल्वे गेटवर वाहतूक कोंडीमुळे मुलांना वेळेत शाळेत पोहचता येत  नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने कृष्णा नदीला पूर आल्यास रेल्वे गेट दरम्यान राहणारे  शिंदे  माळा , संभाजीनगर तसेच वाल्मिकी परिसर इत्यादी भागातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्यास कोणताच पर्यायी मार्ग नाही. प्रशासनाने पंचशीलनगरचा पूल करताना या सर्व बाबींचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षणचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,निलेश शाह आदी पदाधिकारी आदी उपस्थित होते.
कामात वैयक्तीक लक्ष घालू- जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी
जिल्हाधिकारी यांनी यावेज़ी दैनंदिन माहिती घेतली जाईल, तसेच वाहतुक पोलीस कायम तैनात करण्यात  येतील.  स्थानिक नागरिक व प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगितले. शिवाय माझ्याकडून वैयक्तिक  या कामात लक्ष्य दिले जाईल आणि पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकार्‍यांनी दिली.
————-

सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जूनअखेर पीक कर्जाची वसुली करणे बंधनकारक आहे, त्यानुसार पीक कर्जाच्या 2239 कोटीच्या थकबाकीपैकी तब्बल 1744 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. पीक कर्जाच्या वसुलीचे प्रमाण 78 टक्के असून वाळवा आणि कडेगाव तालुक्यातील सर्वाधिक वसुली आहे. दुष्काळी जत तालुक्यातील 444 कोटीपैकी 246 कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आल्याचे बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.
जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगरशेती कारणांसाठी कर्ज वाटप केले जाते. शेती व बिगर शेती कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे बॅकेचा एनपीए वाढला होता. मात्र गेल्या दोन वर्षात बॅँकेने थकबाकी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकर्यांना देण्यात आलेल्या पीक कर्जाची वसुलीला जूनपर्यंत मुदत असते. पीक कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने तालुकानिहाय आणि शाखानिहाय कर्मचार्यांना वसुलीचे टार्गेट दिले होते. थकबाकी न भरणार्यांवर बँकेकडून कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता.
पीक कर्जापैकी जुनी आणि चालू मिळून सुमारे 2237 कोटी इतकी थकबाकी होती. पैकी 1744 कोटी इतकी जूनअखेर वसुली केली. त्याचे प्रमाण 78 टक्के आहे. यामध्ये सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यातून 97.48 इतकी झाली आहे. त्याखालोखाल वाळव्यातून 97.33 टक्के झाली आहे. तर सर्वात कमी दुष्काळी जत तालुक्यातून 55.51 टक्के इतकी झाली आहे. शेती कर्जाची सर्वाधिक थकबाकी असलेल्या जत तालुक्यातील वसुलीसाठी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील अधिकारी, कर्मचार्यांना कामाला लावले होते.

पीक   कर्जाची    तालुकानिहाय वसुली
मिरज 76.06
तासगाव 67.78,
पलूस 85.31
शिराळा 88.56
कवठेमहांकाळ 80.83
खानापूर 90.83
आटपाडी 88.61
एकुण 78.00
———–

सांगली ः मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराविरोधात सुरू असणार्‍या ग्रामसेवक संघटनेच्या काम बंद आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान आमचा लढा हा संबधित आंदोलकांच्या विरोधात नसुन मिरज गटविकास अधिकार्‍यांच्या कार्यपध्दती विरोधात आहे अशी माहीती ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांनी दिली.

मालगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराविरोधात जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी रात्रीपासुन हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शनिवार व रविवार सुट्टीमुळे आंदोलनाचे परिणाम फारसे जाणवले नाहीत. मात्र सोमवारी मोठे परिणाम जाणवले. महाराष्ट्र ग्रामसेवक संघ व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन या ग्रामसेवकांच्या दोन्ही संघटना एकत्रीत या आंदोलनात उतरल्या आहेत. सोमवारी जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्रामसेवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. तालुक्यातील ग्रामसेवक ज्या त्या पंचायत समितीत एकत्र आले.
संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली. संपूर्ण घटनाक्रम कथन केला. सुरेश जगताप हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला उपस्थित राहीले नाही याबाबत तक्रार अर्ज गटविकास अधिकारी मिरज यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडे आलेल्या अर्जावर वेळीच निर्णय देण्यासाठी दीरंगाई केली. त्यामुळे सदरचा संपूर्ण प्रकार घडत आहे या प्रकरणी शासन निर्णयाच्या आधारे या गुन्ह्याला कोणतीही शिक्षा असेल तर ती प्रशासनाने द्यावी व सामाजीक सलोखा अबाधीत ठेवावा.  सदरचे प्रकरण थांबवले पाहिजे या सर्व प्रकरणामुळे ग्रामसेवक संवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरच्या चालु असलेल्या आदोलकांच्या  विरोधात ग्रामसेवक संवर्गाचे कोणतेही आंदोलन नसुन ते गटविकास अधिकारी मिरज यांचे विरोधात करावे लागत आहे अशी माहीती संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी दिली. आंबेडकर जयंतीस गैरहजर या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, जगताप या प्रकरणी दोषी आढळल्यास त्यासाठी शासन निर्णयानुसार जास्तीत जी शिक्षा असेल ती द्यावी, मात्र संभ्रम दुर करावा. परिस्थिती समाजासमोर यावी.
प्रशासनाने दिलेल्या माहीती नुसार जिल्ह्यात एकुण 545 ग्रासेवक कार्यरत असुन त्यापैकी 479 कर्मचारी संपात सहभागी होते. ग्रामसेवक संघटनेने मात्र शंभर टक्के ग्रामसेवक संपात आल्याचा दावा केला आहे.
दोन्ही बाजु समजून घेऊन समन्वय साधू
मालगाव ग्रामविकास अधिकारी व मालगावचे ग्रामस्थ यांच्यातील तक्रार व त्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या ग्रामसेवक आंदोलनाबाबत ग्रामसेवक संघटना व स्थानिक आंदोलक या दोन्ही बाजुंनी आपली निवेदने सीईओ यांच्याकडे दिली आहेत. आम्ही याबाबत माहीती घेत असुन दोन्ही बाजुंची माहीती घेऊन योग्य तो समन्वय साधत या प्रश्‍नी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत.
शशिकांत शिंदे
– उपमुध्यकार्यकारी अधिकारी जि.प. सांगली.
————-

सांगली ः सांगलीतील लोकांना शुध्द पाणी मिळावे यासाठी मनसेने केलेल्या मागण्यांना मनपा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत व्यवस्थेत बदल करण्याचे आश्‍वासन दिल्याची माहीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख तानाजी सावंत यांनी दिली. सांगलीकरांना शुध्द पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प अधिक सक्षम करू, जुन्या व गंजलेल्या खराब झालेल्या जलवाहिन्या बदलण्यासाठी निधीची तरतूद करुन  लवकरच काम चालू करू असे आश्‍वासन मनपा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिल्याचेही श्री सावंत यांनी सांगितले.

सांगली शहराला मिळत असलेल्या दूषित पाण्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा प्रमुख तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त वैभव साबळे यांची भेट घेउन निवेदन देण्यात आले. यावेळी एकुणच पाणी शुध्दीकरण व वितरण व्यवस्थेसह एकुण पाणी पुरवाठ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील पाण्याच्या टाक्या साफ केल्या जात नाहीत त्यामध्ये गाळ  साचलेला आहे  काही ठिकाणी पाण्यात आळी देखील होऊन त्यातून दूषित पाणीपुरवठा शहराला होत आहे याबाबत बोलताना शहरातील सर्व टाक्या वर्षातून दोन वेळा चांगल्या प्रकारे साफ करण्याचे नियोजन करत असल्याचे श्री साबळे यांनी सांगितले.
वारणा उदभव योजना ही केवळ कृष्णा नदीचे पाणी दूषित आहे म्हणून वारणा नदीतून पाणी आणायचे असे नाही तर कृष्णा नदीचे पाणी उन्हाळ्यात किंवा जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा कमी पडते अशावेळी पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, आगामी तीस चाळीस वार्षंची शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाण्याची मागणी पूर्ण व्हावी याचा विचार करीन वारणा नदीचे पाणी कमीत कमी खर्चामध्ये आणता येईल असे प्रयत्न चालू आहेत असे श्री साबळे यांनी स्पष्ट केले.
…अन्यथा पाणी लढा उभारू-सावंत
शुद्ध पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प अधिक सक्षम करणार आहे. जुना महापालिकेचा प्रकल्प पाडून त्या ठिकाणी अजुन एक नवीन सक्षम जलशुधिकर प्रकल्प उभारणार असल्याचेही श्री साबळे यांनी सांगितले आहे, त्यामुळे सदर निवेदनाची दखल घेउन सांगली शहराला शुध्द पाणी पाणीपुरवठा होईल अशी आशा आहे, परंतू नाही झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगलीतील मोठ्या प्रमाणात नागरिकांना सोबत घेऊन पाणी लढा उभारणार असा इशारा श्री सावंत यांनी दिला आहे.
———–

सांगली ः  मिरज  तालुक्यातील मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर प्रशासन अन्याय करीत आहे, असा आरोप करीत शुक्रवारपासून ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनास  जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आणि शिक्षकांनी पाठिंबा दिला. तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शुक्रवार, दि. 19 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हा परिषदेमध्ये सोमवार जिल्हा परिषदेमधील  कर्मचारी समन्वय समितीचे बैठक झाली. या बैठकीला सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी मालगावमधील प्रकरणाची चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती देण्यात आली.
ग्रामविकास अधिकारी जगताप यांच्यावर गटविकास अधिकारी यांनी केलेली कारवाई मागे घ्यावी. जिल्हा  प्रशासनाने कारवाईच्या उद्देशाने केलेली ग्रामपंचायतची तपासणी तातडीने थांबवावी.  मिरजेच्या गटविकास अधिकारी यांनी केलेल्या चुकीसाठी त्यांच्यावर तातडीने प्रशासकीय कारवाई  प्रस्तावित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सर्व विभागातील कर्मचारी आणि जिल्ह्यातील सर्व  शिक्षक मंगळवार, दि. 16 पासून काळ्या  फिती लावून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरूवारपर्यंत  मागण्या मान्य न केल्यास शुक्रवार, दि. 19 पासून  जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात येईल.   बैठकीत  जिल्ह्यातील सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
लिपीकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर बाबर, आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील,  कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष  दत्ता  शिंदे, कक्ष अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तारळकर, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक बनसोडे, परिचर संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश मुळे, ग्रामसेवक संघाचे राज्य उपाध्यक्ष विजय मस्कर, ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, ग्रामसेवक संघटना डीएनए 136 चे जिल्हाध्यक्ष प्रविण देसाई, , यशवंत जाधव, विनायक शिंदे, अविनाश गुरव, विनायक जाधव, उज्वला कुटे, अनिता पाटील, अरूणा कोले, संतोष वीर, विजय डांगे उपस्थित होते.
मिरज बीडीओ यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा
संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की झाल्या प्रकाराबाबत मिरज बीडीओ यांच्या समोरच आम्ही सीईओ यांच्यापुढे तक्रार केली. बीडीओंनी या प्रकरणी योग्य वेळी योग्य ती कार्यवाही न केल्यानेच या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मिरज बीडीओ यांनी याबाबत आपली  भूमिका यावेळी मांडली. दरम्यान जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या बैठकीत मिरज गटविकास अधिकारी यांच्या चुकीमुळे हे प्रकरण घडत असुन त्यांनी केलेल्या चुकीसाठी त्यांच्यावर तात्काळ प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
————

सांगली : विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून मुस्लिम समाजाने हजरत मलिक रेहान याच्या दर्ग्यावर तीन मजली  बांधकाम  केले आहे. गडावर बेकायदा बांधण्यात आलेल्या खोल्यांमध्ये अनेक गैरप्रकार खुलेआम सुरु असून यामुळे गडाचे पावित्र्य नष्ट झाले आहे. सरकारने शिवप्रेमींच्या भावनांची दखल घेवून प्रतापगडप्रमाणे विशाळगडावर अतिक्रमण मोहिम राबविली असती तर आंदोलनाला हिंसक वळण लागले नसते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेवून गडावर तातडीने कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबवावी. तेथील खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याचा दावा माजी आमदार आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी पत्रकार बैठकीत केला.
माजी आम. नितीन शिंदे म्हणाले, विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीने अतिक्रमणमुक्त विशाळगड ही मोहिम हाती घेण्यात  आली आहे. विशाळगडावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत खोल्यांमध्ये अनेक गैरप्रकार सुरु असल्याचे वारंवार समोर आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुक्ती आंदोलनाची दखल घेवून प्राण्यांची कत्तल आणि मद्य विक्री आणि प्राशन करण्यास बंदी घातली होती. तसेच गडावरील वनखात्याच्या जागेवर असणार्‍या बेकायदा खोल्या तोडण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले होते. परंतु आठ खोलीमालकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने याला स्थगिती मिळाली आहे. ही स्थगिती केवळ आठ अनधिकृत खोल्यांपुरतीच आहे.

त्यामुळे शासनाने अन्य बेकायदा बांधकाम तोडायला सुरवात करायला पाहिजे होती. परंतु सरकार शांत राहिले. दि. 7 रोजी गडाच्या पायथ्याशी करण्यात आलेल्या महाआरतीला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु सरकारकडून अतिक्रमण निर्मूलनाबाबत कोणतीच कृती झाली नाही.
आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या
रविवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले असले तरी याला जबाबदार शिवभक्त नाहीत. ज्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे ती सर्व अनधिकृत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. त्यामुळे त्यांना सरकारने नुकसानभरपाई देवू नये. पुरातत्व खाते हिंदूंना गडाची डागडुजी करण्यास मज्जाव करते मात्र मुस्लिमांच्या अनधिकृत बांधकामाकडे डोळेझाक करते. याचाही राग शिवभक्तांच्या मनात आहे. सरकारने गडावरील सर्व बेकायदा बांधकामे तोडून टाकावीत तसेच गडाच्या विकासासाठी विशाळगड विकास प्राधिकरणाची स्थापना करावी. त्यामाध्यमातून गडाचे संवर्धन करण्याचे कार्य करावे. गडावर एकूण 16 मंदिरे होती. त्यापैकी सध्या केवळ 4 शिल्लक आहेत. बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू यांच्या समाधीची दयनीय अवस्था झाली आहे. तर दुसरीकडे दर्ग्यावर तीन मजली बांधकाम झाले आहे. ते बांधकाम तोडून फक्त थडगे ठेवावे अशी मागणीही माजी आ. शिंदे यांनी केली.
हिंदुत्ववादी आमदारांनी आवाज उठवणे अपेक्षित
माजी आम. नितीन शिंदे म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमण या विषयावर पावसाळी अधिवेशनात हिंदूची मते मागणार्‍या सर्व आमदारांनी आवाज उठविणे गरजेचे होते. ज्यावेळी गडाच्या पायथ्याशी महाआरती करण्यात आली तेव्हा तरी या प्रश्‍नावर चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु हिंंदुत्ववादी नव्हे तर सर्वच आमदारांनी विशिष्ठ समाजाची मते जाण्याच्या भितीने या विषयाकडे दुर्लक्ष केले. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाने गडावरील मशीद पाडू नये अशी भूमिका घेतली. या सर्व प्रकारामुळे शिवभक्तांच्या मनात साठलेल्या संतापाचा विस्फोट रविवारी झाला आणि तोडफोड करण्यात आली. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना आमचा पाठिंबा असल्याचेही माजी आ. शिंदे यांनी सांगितले.
———-

सांगली ः   शिवरायांच्या स्वराज्यात बारा बलतेदारांचे योगदान मोलाचे आहे असे उदगार महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई व बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यानी काढले. महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सांगली जिल्हा व मिरज शहर आणि मिरज तालुका यांच्या वतीने आयोजित वीर शिवा काशिद पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.
मिरज येथील शेतकरी भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष  पृथ्वीराज पाटील, सी. आर. सांगलीकर,  मंत्रालय मुंबई येथिल ग्रंथपाल बाबा वाघमारे,विवेक झेंडे, कारागृह अधिक्षक, नगरसेवक निरंजन आवटी, राज्य संघटक शशिकांत गायकवाड, अ‍ॅड. फैय्याज झारी, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल यादव, मिरज शहर अध्यक्ष अरविंद कदम, आदी मान्यवर उपस्थित होते. महादेव साळुंखे, अध्यक्ष स्वराज्य संघ व संपादक दत्तात्रय खंडागळे यांचे व्याख्यान झाले. यावेळी  नाभिक समाजाच्या मागण्याचे निवेदन पृथ्वीराज पाटील याना देणेत आले. वीर शिवा काशिद यांच्या स्मारका सहित इतर मागण्या पुर्ण करणेसाठी पाठपुरावा करु व सर्वतोपरी सहकार्य करु अशी ग्वाही श्री पाटील यांनी दिली.

शशिकांत गायकवाड, अशोक सपकाळ, संगीता काळे विश्‍वनाथ गायकवाड, चंद्रकांत गायकवाड यांच्यासह 101 जणांना जणांना समाज गौरव पुरस्कार देण्यात आला.  कार्यक्रमास जिल्हयातील समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्याध्यक्ष सागर चिखले, संतोष कदम, मल्हारी सपकाळ, रमेश साळुंखे, अनिल खंडागळे,आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सुत्र संचलन विजय दादा कडणे यांनी तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष सागर चिखले यानी केले.
———

सांगली ः जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवावी अशी जिल्हा परिषदेच्या शाळा शनिवारी सकाळ सत्रात भरवल्या जातात. शासन आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शनिवारी सकाळी शाळेची वेळ 9 ते 1.30 केली आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आठवड्यातून केवळ एकच दिवस शनिवारी सकाळ सत्रात असतात. शनिवारी सकाळ सत्रात सामुदायिक कवायत, दप्तरविना शाळा असे विविध उपक्रम शाळा स्तरावर घेतले जातात. त्यामुळे शनिवारी उत्साहाने विद्यार्थी सकाळी शाळेत येतात.जिल्हा परिषदेतील बहुसंख्य विद्यार्थी स्थानिक परिसरातून 1 कि.मी.पेक्षा कमी अंतरावरून येत असल्याने स्कूल बस,वाहतूक यांच्या समस्या याठिकाणी जाणवत नाहीत. शाळेत मध्यान्ह भोजन व्यवस्था असल्याने पालकांना पाल्यांना डबा देण्यासाठी सकाळी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. सद्या असणारे सकाळी  9 ते दुपारी 1.30 यानुसार शाळा दुपारी भर उन्हात सुटतात त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर उन्हाचा त्रास होणार आहे.

शासन परिपत्रक मधील बहुतांश मुद्दे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना लागू होत नाहीत.पूर्वापार जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळ सत्रात 7.30 ते 11.15 वेळेत भरत होत्या. सदर वेळ बदलण्याबाबत जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे पालक,शाळा व्यवस्थापन समिती यांनी कोठेही मागणी केल्याचे दिसत नाही. शासन आदेशातील स्थानिक परिस्थिती पाहून शाळा वेळेत बदल करण्यात यावी असे म्हंटले आहे, त्याचा विचार करावा. जर सकाळी 9 वाजता शाळा सुरू करायची असल्यास शाळा सुटण्याची वेळ दुपारी 12 पेक्षा पुढे नसावी याची काळजी घ्यावी, अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेने केली आहे.  जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी निवेदन देवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली.याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, जुनी पेन्शन संघटन जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले,जिल्हा सचिव स्वप्नील मंडले,विभागीय अध्यक्ष सागर खाडे,संघटक संदीप माने उपस्थित होते.
————-

सांगली : जुना बुधगाव रोड वरून पंचशील नगर कडे जाणार्‍या रेल्वे गेट जवळील पुलाचे बांधकाम सुरू केल्याने नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली आहे असे आश्‍वासन संबंधित कामाचे ठेकेदार व रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सर्वपक्षीय कृती समितीला दिली. लोकांची गैरसोय होणार नाही व नव्या समस्या निर्माण होणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी आदी सूचना यावेळी ठेकेदार व रेल्वे अधिकार्‍यांना करण्यात आल्या.

काल सोमवारी सकाळी सर्व पक्षीय कृती समितीचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवरांनी जुना बुधगाव रोड पंचशीलनगर रेल्वे गेटला सुरु होणार्‍या पुलाची पाहणी करत भेट दिली.यावेळी रेल्वे पुलाची काम करणारी ठेकेदार कौलगुड कंपनीचे मॅनेजर तसेच महारेलचे अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. संबंधित कंपनीकडून पुलाचे डिजाईन समजून घेतले.
रेल्वेने दिलेला पर्यायी रस्ता योग्य आहे का याची सर्वांनी पाहणी केली.
चिंतामणनगरचा पूल पूर्ण क्षमतेने सुरु झाल्याशिवाय पंचशीलनगरचा पूल सुरु करू नये अशी मागणी होती याबाबत बोलताना महारेल तसेच ठेकेदार कंपनीने नागरिकांची कोणतीच गैरसोय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी घेण्यात येईल असे सांगितले.

विकासकामांना विरोध नाही आणि विरोधाला विरोध म्हणून पुलाच्या कामाला कोणाचाच विरोध नाही.
पुलाचे काम मुदतीत व्हावे
राजकारणविरहित पुलाचे काम व्हावे.
फक्त नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली.बॅरेकेटिंग रेल्वे ट्रॅक पर्यंत लावण्यात येऊ नये म्हणजे शिंदे मळा आणि मरगुबाई कॉलनीकडे जाणार्‍या नागरिकांना अडथळा येऊ नये. तसेच ठेकेदार कंपनीने जुना बुधगावरोडवर सुरक्षारक्षक नेमावे जेणेकरून कोणता अपघात होऊ नये. शिवाय जुना बुधगाव बायपास रोडवर प्रवाशांना येण्या जाण्याच्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून दिशादर्शक फलक ठिकठिकाणी लावण्यात यावेत. स्थानिक नागरिकांशी चर्चा करून काम करावे. शाळेचा परिसर असल्यामुळे मुले वेळेत शाळेत पोहचतील याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अश्या सूचना आज सर्वांच्यावतीने करण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज,सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर,राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, कृती समितीचे उमेश देशमुख, गजाजन साळुंखे, सुनील मोहिते,आनंदा लीगाडे,फारुख शेख, युवराज पवार तसेच ठेकेदार कौलगूड कंपनीचे मॅनेजर तसेच महारेलचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.
————

सांगली :  अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य चाम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत तिमीर बॅडमिंटन अकॅडमी सांगलीचे घवघवीत यश मिळवले. अहमदनगर येथे झालेल्या बँडमिटन स्पर्धेत तिमीर बँडमिटन अकँडमीचे ऋतिका कांबळे,अनुष्का इपटे,पार्थ देवरे,तन्वी घारपुरे व स्वरित सातपुते यांनी यश संपादन केले.

महिला दुहेरी 15 वर्षे वयोगटामधे ऋतिका कांबळे-अनुष्का इपटे यांनी अत्यंत रोमहर्षक अशा अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावले. तर 17 वर्षे वयोगट मिक्स दुहेरी अत्यंत अटीतटीचा चाललेल्या अंतिम सामन्यात  पार्थ देवरे-तन्वी घारपुरे यांनी
दमदार खेळ करत प्रतिस्पर्धी जोडीवर मात करुन विजेतेपद पटकावले. 15 वर्षे वयोगट मिक्स दुहेरीमधे ऋतिका कांबळे व स्वरित सातपुते यांना  उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अनुष्का इपटे 15 वर्षे वयोगटात उपांत्य फेरीत मजल मारली. संपूर्ण महाराष्ट्राची नजर ऋतिका कांबळे हीच्यावर होती. हीने तब्बल तिन प्रकारात सहभाग नोंदवत यश मिळविले.
या संपूर्ण स्पर्धेवर तिमीर बँडमिटन अकँडमीच्या खेळाडूचा दबदबा राहिला.
बँडमिटनमधे या खेळाडूनी सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. हे सर्व खेळाडू ऑलंपिक गोल्ड क्विस्ट सन्मानित प्रशिक्षक तिमीर आरवारे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करीत आहेत. सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
————-

सांगली : जनतेच्या पाठिंब्यावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर, यंदा सांगली विधानसभा निवडणूक ही जनतेतूनच लढविणार असल्याचे ठाम निर्धार जयश्री पाटील यांनी व्यक्त केला. चिंतामणी हाऊसिंग सोसायटी, चिंतामणनगर सांगली या परिसरामध्ये मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील यांचे शुभ हस्ते तसेच सावली बेघर लाभार्थी यांचे समवेत 100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांशी त्या बोलत होत्या.

काँग्रेस नेत्या, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीवहिनी यांनी, सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून चिंतामणी हाऊसिंग सोसायटीमध्ये 100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये ज्यांना वृक्षारोपणासाठी झाडे लागतील, अशा सर्व नागरिकांना मोफत झाड देण्याची सोय युवा मंचाकडून करण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून करण्यात आले आहे.
यावेळी मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, दिनेश सादिगले, दीपक गुडे, महेश काळे, भारत ऐवळे,  गडवीर काका, समाधान सरगर, दिलीप जाधव, सचिन शहा, शाहनवाज फकीर, संभाजी कदम, इरफान मुजावर, राजू पाटील, सुभाष ककडे, लक्ष्मण गडदे, विष्णू माने आधी प्रमुख पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———-

सांगली :  राज्यात दुध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्यात या नाराजीचा उद्रेक आंदोलनांच्या निमित्ताने पुढे येत आहे. उत्स्फुर्तपणे दुध उत्पादकांनी ठिकठीकाणी रास्तारोको, उपोषणे. निदर्शने सुरु केली आहेत. सरकारने या सर्व आंदोलनांची दखल घ्यावी व दुध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सरकारला केले असल्याचे निवेदन दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने तहसिलदार विटा (खानापूर) यांना देण्यात आले.

दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 28 जून पासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन सुरु आहे. किसान सभा व समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र होत आहे.
गेले वर्षभर दुध दराबाबत शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. प्रति लिटर 10 ते 15 रुपयांचा तोटा सहन करून दुध उत्पादक शेतकरी दुध घालत आहेत. दुध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान 40 रुपये दर द्यावा, बंद केलेले दुध अनुदान पुन्हा सुरु करावे. वाढता उत्पादनखर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर 10 रुपये करावे तसेच अनुदान बंद काळात दुध घातलेल्या शेतकर्‍यांना या काळातील अनुदान द्यावे या मागण्या दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.
दुधाचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तत्कालीन उपाय योजनांच्या बरोबरच दीर्घकालीन दुध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करावी, पशुखाद्य व पशु औषधांचे दर नियंत्रित करावेत, खाजगी व सहकारी दुध संघाना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करावा. दुध भेसळ रोखावी, अनिष्ट ब्रँडवार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा, मिल्कोमीटर व वजन काट्यात होणारी दुध उत्पादकांची लुटमार थांबविण्यासाठी तालुका निहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी, शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा योजना सुरु करावी या मागण्या संघर्ष समिती करत आहे. राज्य सरकारने दुध उत्पादकांच्या या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. दिनांक 28 जून पासून सुरु झालेल्य या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर विस्तारत असून राज्य सरकारने या पार्श्‍वभूमीवर दुध उत्पादकांचा अधिक अंत पाहू नये असे आवाहन करण्यात येत आहे.उमेश देशमुख, सतिश साखळकर, महेश खराडे, सुहास जाधव, महादेव जाधव, सुरेखा जाधव, जोतीराम जाधव आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
————–
सांगली ः जुना बुधगावरोड पंचशिलनगर येथिल रेल्वे पुलाच्या बांधकामामुळे लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या अशी सुचना माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना केली.जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसेही यावेळी उपस्थित होत्या. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी त्या ठिकाणची परिस्थिती व संभाव्य अडचणी जिल्हाधिकार्‍यांसमोर मांडल्या.

जुना बुधगाव रोड पंचशीलनगर रेल्वे गेट संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय  बजाज  जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेत  जुना बुधगाव रोड पंचशीलनगर  रेल्वे गेटबाबत  समस्या मांडल्या.
श्री बजाज यांनी यावेळी सांगितले, चिंतामणनगरचा पूल पूर्ण कार्यक्षमतेने सुरु झाल्याशिवाय पंचशीलनगरचा पूल बांधण्यास घेऊ नये अशी सर्वांचीच मागणी आहे. मात्र हे काम सुरू करताना त्याचा विचार करताना दिसला नाही.  वाहतूक कोंडी मुळे रेल्वे गेटच्या दुतर्फा एकेक किलोमीटर  रांगा  लागतात.त्यामुळे  नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. रेल्वे गेटवर वाहतूक कोंडीमुळे मुलांना वेळेत शाळेत पोहचता येत  नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने कृष्णा नदीला पूर आल्यास रेल्वे गेट दरम्यान राहणारे  शिंदे  माळा , संभाजीनगर तसेच वाल्मिकी परिसर इत्यादी भागातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्यास कोणताच पर्यायी मार्ग नाही. प्रशासनाने पंचशीलनगरचा पूल करताना या सर्व बाबींचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षणचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,निलेश शाह आदी पदाधिकारी आदी उपस्थित होते.
सांगली : विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून मुस्लिम समाजाने हजरत मलिक रेहान याच्या दर्ग्यावर तीन मजली  बांधकाम  केले आहे. गडावर बेकायदा बांधण्यात आलेल्या खोल्यांमध्ये अनेक गैरप्रकार खुलेआम सुरु असून यामुळे गडाचे पावित्र्य नष्ट झाले आहे. सरकारने शिवप्रेमींच्या भावनांची दखल घेवून प्रतापगडप्रमाणे विशाळगडावर अतिक्रमण मोहिम राबविली असती तर आंदोलनाला हिंसक वळण लागले नसते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेवून गडावर तातडीने कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबवावी. तेथील खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याचा दावा माजी आमदार आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी पत्रकार बैठकीत केला.
माजी आम. नितीन शिंदे म्हणाले, विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीने अतिक्रमणमुक्त विशाळगड ही मोहिम हाती घेण्यात  आली आहे. विशाळगडावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत खोल्यांमध्ये अनेक गैरप्रकार सुरु असल्याचे वारंवार समोर आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुक्ती आंदोलनाची दखल घेवून प्राण्यांची कत्तल आणि मद्य विक्री आणि प्राशन करण्यास बंदी घातली होती.

तसेच गडावरील वनखात्याच्या जागेवर असणार्‍या बेकायदा खोल्या तोडण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले होते. परंतु आठ खोलीमालकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने याला स्थगिती मिळाली आहे. ही स्थगिती केवळ आठ अनधिकृत खोल्यांपुरतीच आहे. त्यामुळे शासनाने अन्य बेकायदा बांधकाम तोडायला सुरवात करायला पाहिजे होती. परंतु सरकार शांत राहिले. दि. 7 रोजी गडाच्या पायथ्याशी करण्यात आलेल्या महाआरतीला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु सरकारकडून अतिक्रमण निर्मूलनाबाबत कोणतीच कृती झाली नाही.
आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या

रविवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले असले तरी याला जबाबदार शिवभक्त नाहीत. ज्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे ती सर्व अनधिकृत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. त्यामुळे त्यांना सरकारने नुकसानभरपाई देवू नये. पुरातत्व खाते हिंदूंना गडाची डागडुजी करण्यास मज्जाव करते मात्र मुस्लिमांच्या अनधिकृत बांधकामाकडे डोळेझाक करते. याचाही राग शिवभक्तांच्या मनात आहे. सरकारने गडावरील सर्व बेकायदा बांधकामे तोडून टाकावीत तसेच गडाच्या विकासासाठी विशाळगड विकास प्राधिकरणाची स्थापना करावी. त्यामाध्यमातून गडाचे संवर्धन करण्याचे कार्य करावे. गडावर एकूण 16 मंदिरे होती. त्यापैकी सध्या केवळ 4 शिल्लक आहेत. बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू यांच्या समाधीची दयनीय अवस्था झाली आहे. तर दुसरीकडे दर्ग्यावर तीन मजली बांधकाम झाले आहे. ते बांधकाम तोडून फक्त थडगे ठेवावे अशी मागणीही माजी आ.शिंदे यांनी केली.

हिंदुत्ववादी आमदारांनी आवाज उठवणे अपेक्षित
माजी आम. नितीन शिंदे म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमण या विषयावर पावसाळी अधिवेशनात हिंदूची मते मागणार्‍या सर्व आमदारांनी आवाज उठविणे गरजेचे होते. ज्यावेळी गडाच्या पायथ्याशी महाआरती करण्यात आली तेव्हा तरी या प्रश्‍नावर चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु हिंंदुत्ववादी नव्हे तर सर्वच आमदारांनी विशिष्ठ समाजाची मते जाण्याच्या भितीने या विषयाकडे दुर्लक्ष केले. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाने गडावरील मशीद पाडू नये अशी भूमिका घेतली. या सर्व प्रकारामुळे शिवभक्तांच्या मनात साठलेल्या संतापाचा विस्फोट रविवारी झाला आणि तोडफोड करण्यात आली. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना आमचा पाठिंबा असल्याचेही माजी आ. शिंदे यांनी सांगितले.
———-

सांगली ः   शिवरायांच्या स्वराज्यात बारा बलतेदारांचे योगदान मोलाचे आहे असे उदगार महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई व बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यानी काढले. महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सांगली जिल्हा व मिरज शहर आणि मिरज तालुका यांच्या वतीने आयोजित वीर शिवा काशिद पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.
मिरज येथील शेतकरी भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष  पृथ्वीराज पाटील, सी. आर. सांगलीकर,  मंत्रालय मुंबई येथिल ग्रंथपाल बाबा वाघमारे,  विवेक झेंडे, कारागृह अधिक्षक, नगरसेवक निरंजन आवटी, राज्य संघटक शशिकांत गायकवाड, अ‍ॅड. फैय्याज झारी, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल यादव, मिरज शहर अध्यक्ष अरविंद कदम, आदी मान्यवर उपस्थित होते. महादेव साळुंखे, अध्यक्ष स्वराज्य संघ व संपादक दत्तात्रय खंडागळे यांचे व्याख्यान झाले. यावेळी  नाभिक समाजाच्या मागण्याचे निवेदन पृथ्वीराज पाटील याना देणेत आले. वीर शिवा काशिद यांच्या स्मारका सहित इतर मागण्या पुर्ण करणेसाठी पाठपुरावा करु व सर्वतोपरी सहकार्य करु अशी ग्वाही श्री पाटील यांनी दिली.
शशिकांत गायकवाड, अशोक सपकाळ, संगीता काळे विश्‍वनाथ गायकवाड, चंद्रकांत गायकवाड यांच्यासह 101 जणांना जणांना समाज गौरव पुरस्कार देण्यात आला.  कार्यक्रमास जिल्हयातील समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्याध्यक्ष सागर चिखले, संतोष कदम, मल्हारी सपकाळ, रमेश साळुंखे, अनिल खंडागळे,आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सुत्र संचलन विजय दादा कडणे यांनी तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष सागर चिखले यानी केले.
———

सांगली ः जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवावी अशी
जिल्हा परिषदेच्या शाळा शनिवारी सकाळ सत्रात भरवल्या जातात. शासन आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शनिवारी सकाळी शाळेची वेळ 9 ते 1.30 केली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आठवड्यातून केवळ एकच दिवस शनिवारी सकाळ सत्रात असतात. शनिवारी सकाळ सत्रात सामुदायिक कवायत, दप्तरविना शाळा असे विविध उपक्रम शाळा स्तरावर घेतले जातात. त्यामुळे शनिवारी उत्साहाने विद्यार्थी सकाळी शाळेत येतात.जिल्हा परिषदेतील बहुसंख्य विद्यार्थी स्थानिक परिसरातून 1 कि.मी.पेक्षा कमी अंतरावरून येत असल्याने स्कूल बस,वाहतूक यांच्या समस्या याठिकाणी जाणवत नाहीत.

शाळेत मध्यान्ह भोजन व्यवस्था असल्याने पालकांना पाल्यांना डबा देण्यासाठी सकाळी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. सद्या असणारे सकाळी  9 ते दुपारी 1.30 यानुसार शाळा दुपारी भर उन्हात सुटतात त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर उन्हाचा त्रास होणार आहे.
शासन परिपत्रक मधील बहुतांश मुद्दे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना लागू होत नाहीत.पूर्वापार जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळ सत्रात 7.30 ते 11.15 वेळेत भरत होत्या. सदर वेळ बदलण्याबाबत जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे पालक,शाळा व्यवस्थापन समिती यांनी कोठेही मागणी केल्याचे दिसत नाही. शासन आदेशातील स्थानिक परिस्थिती पाहून शाळा वेळेत बदल करण्यात यावी असे म्हंटले आहे, त्याचा विचार करावा. जर सकाळी 9 वाजता शाळा सुरू करायची असल्यास शाळा सुटण्याची वेळ दुपारी 12 पेक्षा पुढे नसावी याची काळजी घ्यावी, अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेने केली आहे.  जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी निवेदन देवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली.याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, जुनी पेन्शन संघटन जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले,जिल्हा सचिव स्वप्नील मंडले,विभागीय अध्यक्ष सागर खाडे,संघटक संदीप माने उपस्थित होते.
————-

सांगली : जुना बुधगाव रोड वरून पंचशील नगर कडे जाणार्‍या रेल्वे गेट जवळील पुलाचे बांधकाम सुरू केल्याने नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली आहे असे आश्‍वासन संबंधित कामाचे ठेकेदार व रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सर्वपक्षीय कृती समितीला दिली. लोकांची गैरसोय होणार नाही व नव्या समस्या निर्माण होणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी आदी सूचना यावेळी ठेकेदार व रेल्वे अधिकार्‍यांना करण्यात आल्या.
काल सोमवारी सकाळी सर्व पक्षीय कृती समितीचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवरांनी जुना बुधगाव रोड  पंचशीलनगर रेल्वे गेटला  सुरु होणार्‍या पुलाची पाहणी करत भेट दिली.यावेळी रेल्वे पुलाची काम करणारी ठेकेदार कौलगुड कंपनीचे मॅनेजर तसेच महारेलचे अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. संबंधित कंपनीकडून पुलाचे डिजाईन समजून घेतले.
रेल्वेने दिलेला पर्यायी रस्ता योग्य आहे का याची सर्वांनी पाहणी केली.

चिंतामणनगरचा पूल पूर्ण क्षमतेने सुरु झाल्याशिवाय पंचशीलनगरचा पूल सुरु करू नये अशी मागणी होती याबाबत बोलताना महारेल तसेच ठेकेदार कंपनीने नागरिकांची कोणतीच गैरसोय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी घेण्यात येईल असे सांगितले.

विकासकामांना विरोध नाही आणि विरोधाला विरोध म्हणून पुलाच्या कामाला कोणाचाच विरोध नाही.
पुलाचे काम मुदतीत व्हावे राजकारणविरहित पुलाचे काम व्हावे.फक्त नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली.
बॅरेकेटिंग रेल्वे ट्रॅक पर्यंत लावण्यात येऊ नये म्हणजे शिंदे मळा आणि मरगुबाई कॉलनीकडे जाणार्‍या नागरिकांना अडथळा येऊ नये. तसेच ठेकेदार कंपनीने जुना बुधगावरोडवर सुरक्षारक्षक नेमावे जेणेकरून कोणता अपघात होऊ नये. शिवाय जुना बुधगाव बायपास रोडवर प्रवाशांना येण्या जाण्याच्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून दिशादर्शक फलक ठिकठिकाणी लावण्यात यावेत. स्थानिक नागरिकांशी चर्चा करून काम करावे. शाळेचा परिसर असल्यामुळे मुले वेळेत शाळेत पोहचतील याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अश्या सूचना आज सर्वांच्यावतीने करण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज,सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर,राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, कृती समितीचे उमेश देशमुख, गजाजन साळुंखे, सुनील मोहिते,आनंदा लीगाडे,फारुख शेख, युवराज पवार तसेच ठेकेदार कौलगूड कंपनीचे मॅनेजर तसेच महारेलचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here