४८ तासाच्या आत तहसीलदारांचा खून करेन,निकाल विरोधात दिला म्हणून थेट धमकी | एकावर गुन्हा दाखल

0

उमदी : संख (ता.जत) येथील अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांचा ४८ तासांच्या आत खून करु टाकू,अशी धमकी उमदी (ता.जत) येथील सुमित नाटीकर याने सांगली जिल्हाधिकारी यांच्या मेलवर दिली आहे.या प्रकाराने सांगली महसूल विभागात प्रंचड खळबळ उडाली आहे. उमदी पोलिसांनी तात्काळ संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. नाटीकर याने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या मेलवर खुनाची धमकी पाठविली आहे.

उमदीतील सुमित नाटीकर याचा त्याच्या भावकीतील लोकांशी शेतातील रस्त्यावरून वाद सुुरू होता.हा वाद अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्याकडे न्यायप्रविष्ट होता.त्यांनी यावर निर्णय देताना शेतात प्रत्यक्ष पाहणी केली.
Rate Card
सर्वांचे जाबजबाब घेऊन एकाच सर्व्हे नंबरमध्ये सर्वांची शेती असल्याने नाटीकर याच्या शेतातून सामाईक रस्ता देण्याचा आदेश ४ महिन्यांपूर्वी काढत निर्णय दिला होता.यामुळे नाटीकर रागात होता.रागातूनच त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मेलवर धमकीचे पत्र पाठविले.या मेलवर  ४८ तासांच्या आत मागाडे यांचा खून करतो असा मजकूर लिहला आहे.

अपर तहसीलदार मागाडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार उमदी पोलिस ठाण्यात तक्रार देताच, पोलिसांनी नाटीकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.त्याचा शोध सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.