सांगोला : फॅबटेक पब्लिक स्कूलला 13 जुलै 2024 रोजी मीमांसा स्कूल अवार्डस पुणे चॅप्टर 2024 मध्ये आऊटस्टँडिंग इम्प्लिमेंटेशन ऑफ लाईफ स्किल्स प्रोग्राम्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अथोस एज्युसोल्यूशन्स यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांना मीमांसा शाळा पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी हा प्रतिष्ठेचा सुपर 30 एज्युकेटर्स मीमांसा शाळा पुरस्कार 2024 फॅबटेक पब्लिक स्कूलला मिळाला.13 जुलै रोजी पुण्यातील कोरीथियन्स येथे झालेल्या एमआयएमएसए प्राचार्य परिषद आणि पुरस्कार समारंभात शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी 700 हून अधिक शाळांची नोंदणी झाली होती.
विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक जीवन कौशल्य जोपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना योग्यरीत्या घडवणे, या सर्व पैलूंवरती प्रकाश टाकत उत्कृष्टपणे जीवन घडवणे हेच महत्त्वाचे पायाभूत सुविधा, शैक्षणिक पद्धती अभ्यासेत्तर आणि खेळ, अभ्यासक्रम यांच्यावर लक्ष देऊन केलेल्या अनुकरणीय कार्यावर प्रकाश टाकत विशेष गरजांमध्ये नावीन्य तंत्रज्ञानाची तयारी शाळेतील उच्च दर्जाची मानके या सर्वांचे मूल्यमापन करण्यात येऊन फॅबटेक पब्लिक स्कूलला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात समर्पण नाविन्य आणि कार्याशी बांधिलकी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी केले जाणारे अथक प्रयत्न, मेहनत, सर्जनशीलता आणि शिक्षण निष्ठेचा हा पुरावा आहे.