जत : कर्नाटक राज्यातील तुबची बबलेश्वर पाणी योजनेचे आवर्तन चालु ठेवणेबाबत कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांना जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी निवेदन दिले.जतच्या पूर्व भागातील पाणी प्रश्नासाठी ना.एम.बी.पाटील यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. विस्तारित म्हैशाळ योजना पूर्ण होईपर्यंत तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी जत पूर्व भागातील शेतशिवारात खेळते रहावे याकरिता प्रयत्न सुरु असुन सदर निवेदनाचा विचार करून ते नक्कीच मदत करतील हा विश्वास वाटतो.