सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जत येथील शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा उद्घाटन सोहळा रविवारी (दि.२८) दुपारी एक वाजता होणार आहे, अशी माहिती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली.
ते म्हणाले, बँकेच्या जत येथील शाखेची स्थापना १९७८ मध्ये झाली. बँकेच्या जुन्या इमारतीतील फर्निचर, रंगकाम आदीमध्ये बदल करून अद्ययावत करण्यात आली आहे. सुमारे ९० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन रविवारी होणार आहे.
या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक हे अध्यक्षस्थानी असतील. आमदार विक्रमसिमह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, बँकेचे माजी संचालक सरदार पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, सहाय्यक निबंधक अमोल डफळे हे प्रमुख पाहुणे आहेत