आमदार सावंत यांच्या प्रयत्नाला यश म्हैसाळ योजनेचे आवर्तन चालू

0
8


जत : सततच्या प्रयत्नामुळे आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पावसाळ्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर येथील कृष्णा नदी परिसरात पूरस्थिती निर्माण होते.परिस्थितीमध्ये या पूर स्थितीमध्ये नदीकाठाची गावे पाण्याखाली जातात.अशा परिस्थितीमध्ये पुराचे वाहून जाणारे पाणी जत,कवठेमहांकाळ,मिरज पूर्व भाग,सांगोला,मंगळवेढा या दुष्काळी तालुक्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी सतत आ.विक्रमसिंह सावंत करीत असतात.चालू वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा आ.विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यामध्ये समाधान कारक पाऊस झाला नसून पाणी दुष्काळी भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.यासाठी पुराचे वाहून जाणारे पाणी जत तालुक्यास म्हैसाळ योजनेचे पंप चालू करून पाणी सोडावे अशी मागणी विधानसभेमध्ये केली तसेच या मागणीसाठी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन केले,याची दखल घेऊन कृष्णा नदीचे पुराचे पाणी जत तालुक्यासाठी चालू करणेत आले आहे.

 

जत तालुक्यासाठी ३ पंप चालू करणेत आले असून मोठ्या प्रमाणावर पाणी सुरु झालेले असून आ.विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून पाणी सुरु झाल्याने  शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार असून जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील सर्व तलाव,बंधारे,ओढे नाले भरून देणेत येणार असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी,कुपनलिका यांना पाणी वाढणारे असून या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये होणार आहे.

 

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here