पुर्णक्षमतेने पुराचे पाणी जतला सोडा | – आ.विक्रमसिंह सावंत

0
11
जत : सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली.सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने कोणत्याही क्षणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर जत सारख्या आमच्या दुष्काळी भागात समाधानकारक पाऊस झाला नसून तलाव कोरडे पडले आहेत.

 

यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सर्व पंप चालू करून दुष्काळी तालुक्यांना पुराचे पाणी सोडल्यास पूरस्थिती कमी होण्यास हातभार लागणार आहे. जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भाग या दुष्काळी भागातील सर्व तलाव बंधारे भरल्यास दुष्काळी परिस्थिती कमी होईल आणि उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही अशी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भूमिका मांडली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here