जत : जत तालुक्यातील आर के नगर तथा बांधकाम क्षेत्रातील विश्वनीय नाव असलेले प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खलाटीपासून सुरू झालेले सत्कार सोहळे रात्री उशिरापर्यंत सुरू होते जत तालुक्यातील अभ्यास प्रज्ञावंत असे असलेले राजेंद्र कोळेकर हे जतच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपली उपलब्धता सिद्ध केले आहे. वाढदिवसानिमित्त तालुकाभरात तालुक्यातील कळीचे मुद्दे असलेले डिजिटल फलक गावागावात झळकावून जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे.
जतच्या या प्रश्नांना मी प्राधान्याने सोडवण्यासाठीच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो असल्याचे स्पष्ट केले आहे.जत तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाणी रस्ते रोजगार, त्याचबरोबर जत तालुक्यातील सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न असलेले तालुक्याचे विभाजन अशा अनेक प्रश्नांचे गावागावात डिजिटल फलक लावून या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मला आशीर्वाद द्यावा,अशी साद वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेला घातली आहे.आज रविवारी प्राध्यापक कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक प्रतिष्ठित मान्यवर राजकीय मंडळींनी त्याचबरोबर राज्यातील काही महत्त्वाच्या हस्तींनी प्राध्यापक कोळेकर यांना शुभेच्छा दिल्याने त्यांची विधानसभेतील दावेदारी अधोरेखित झाली आहे.
जत तालुक्यातील सुमारे 116 गावात प्राध्यापक कोळेकर यांनी तालुक्यातील विविध समस्याचे वस्तुनिष्ठ डिजिटल फरक झळकावत आपण मला विजयी केल्यास या सर्व समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणूक प्रचाराचा खलाटीतून श्रीगणेशा
प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी जत पश्चिम भागातील खलाटी येथील जागृत देवस्थान श्री लकाबाई देवीच्या मंदिरात वाढदिवसानिमित्त प्रांरभी दर्शन घेऊन प्रा.कोळेकर यांनी तालुक्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे.हा एक प्रकारे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्री गणेशा असल्याचे बोलले जात आहे.खलाटी देवस्थान कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने प्राध्यापक कोळेकर यांचा सत्कार करण्यात आला.त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा ही देण्यात आला.यावेळी गावातील प्रमुख व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
खलाटी ता.जत येथे प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांचा देवस्थान कमिटी व खलाटी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.