सलगरे : रविंद्र वस्त्र निकेतनचा रक्षाबंधन सेल रविवारी मात्र ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक निर्माण करणारा ठरला रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने अनेक महिला युवती व कुटुंबातील सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती.सेलमुळे मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी यावेळी ग्राहकांनी केल्याचे दिसून आले.दरम्यान दररोज खरेदीसाठी ग्राहकांचे गर्दीचे उच्चांक वाढत आहेत.
सेलमध्येसुद्धा अत्यंत दर्जेदार व ग्राहकांना परवडतील, असे कपडे उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांकडून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या ग्राहकांचा वाढता ओघ पाहून रविंद्र वस्त्र निकेतनच्यावतीने स्टाफच्या संख्येमध्ये वाढ केली आहे.
मोठ्या प्रमाणात सर्वत्र कपडे पहावयास मिळत असल्याने ग्राहक ही मुक्तपणे खरेदीचा आनंद घेत होते. अत्यंत कमी किमतीत रक्षाबंधनासाठी ही सुवर्णसंधी असल्याने ग्राहकांचा मोठा कल आज रविवारी रविंद्र वस्त्र निकेतनच्या शाखांमध्ये दिसून आला.यावेळी अतिशय दर्जेदार वस्त्रे व रविंद्र वस्त्र निकेतनने व्यवसायातून आपली विश्वासार्थता टिकवली असल्याचे ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आले. आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावी यासाठी रविंद्र वस्त्र निकेतनने तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, तुंग, जत, शिरोळ, सावळज कोळे, पलूस, संख, कडेगाव, कवठेमहांकाळ व कर्नाटकातील रायबाग तेलसंग शिरूर या ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या शाखा सुरू केले आहेत.
सध्या या सर्वच शाखांसहित सलगरे येथील मुख्य शाखेमध्येही हा सेल सुरू आहे.दिनांक नऊ ऑगस्टपासून ते २१ ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरूच राहणार असून आहे.रविंद्र वस्त्र निकेतनचा रक्षाबंधन सेल रविवारी सर्वच शाखांमध्ये ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक निर्माण करणारा ठरला आहे.