रोहितकडे पाहून वाटते जिल्ह्याचे भवितव्य सुरक्षित आहे | खा. विशाल पाटील : आर. आर. पाटील कुटुंबीयांनी वसंतदादा घराण्याचे अस्तित्व जिवंत ठेवले : तासगावमध्ये कृषीहित प्रदर्शनाचे उद्घाटन

0
8

 

तासगाव : रोहित पाटील यांच्या अंगी इतक्या कोवळ्या वयात अत्यंत परिपक्वता दिसून येते. त्यांच्याकडे पाहून सांगली जिल्ह्याचे भवितव्य सुरक्षित आहे असे वाटते, असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी केले. शिवाय वसंतदादा घराण्याचे अस्तित्व जिवंत ठेवण्याचे काम स्व. आर. आर. पाटील कुटुंबीयांनी केले, असेही ते म्हणाले.

 

स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त येथील दत्त माळावर आयोजित कृषीहित या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार पाटील बोलत होते. यावेळी आ. सुमन पाटील, जगन्नाथ मस्के, जि. म. बँकेचे संचालक सुरेश पाटील, हणमंतराव देशमुख, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्ष अनिता सगरे, हणमंतराव देसाई, बाळासाहेब पाटील, राजाराम पाटील, स्मिता पाटील, तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर उपस्थित होते.

 

ते म्हणाले, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन तासगावात आयोजित करण्यात आलेले कृषीहित प्रदर्शन शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल. तासगाव तालुक्यात आज विविध योजनेतून पाणी आले आहे. याचे श्रेय हे अंजनीकर कुटुंबियांचे आहे.

खासदार विशाल पाटील, म्हणाले, शेतात पाणी आले. त्या पाण्यातून शेतात नवनविन वेगवेगळी पिके कशी घेता येतील, यासाठी रोहित पाटील यांनी आयोजित केलेले हे कृषीहित प्रदर्शन शेतकऱ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल.प्रास्ताविक करताना युवानेते रोहित पाटील म्हणाले, तालुक्यातील पाणी योजना मार्गी लावून दुष्काळी तासगाव तालुका हा राज्याच्या नकाशावरील शब्द पुसण्याचे काम स्व. आर. आर. पाटील यांनी केले. तरूणांच्यासाठी आयोजित कौशल्य विकास उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगून शाश्वत विकासाचे पाऊल उचलले जात आहे. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी कृषीभवन उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून शालेय पोषण आहारात बेदाण्याचा वापर व्हावा. हा निर्णय देशपातळीवर व्हावा असे ही रोहित पाटील यांनी बोलून दाखवले.

 

यावेळी बाजार समिती सभापती युवराज पाटील, रविंद्र पाटील, अजित जाधव, डी.ए. माने, ऍड. गजानन खुजट, अमोल पाटील, प्रा. जी. के. पाटील, संजय पाटील, अमित पाटील, खंडू कदम, सर्जेराव पाटील, नलिनीताई पवार, शुभांगी साळुंखे, पूनम माळी, संध्याराणी मंडले, सत्वशिला पाटील उपस्थित होते.

 

रोहित कमी वयात मोठी जबाबदारी पार पाडत आहे : खा. विशाल पाटील

यावेळी खा. विशाल पाटील म्हणाले, रोहित पाटील यांना तुम्ही आमदार कराल. पण, त्यांच्या झालेल्या प्रचारसभा, पदयात्रा यामुळे राज्यात अनेकजण खासदार झाले आहेत. आबा कुटुंबियांचे आणि दादा कुटुंबियांचे संबंध खूप वेगळे आहेत. फार कमी वयात रोहित खूप मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याकडे पाहून सांगली जिल्हयाचे भवितव्य सुरक्षित आहे, असे वाटते, असे स्पष्ट करून आबा कुटुंबियांनी कधीच कोणाला उपाशी पाठवलेले नाही असेही त्यांनी सांगितले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here