भूमिपुत्र रविपाटलांसाठी चक्क रक्ताने लिहिले पत्र

0
2

जत:आपल्या लाडक्या नेत्याला विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी एका ध्येयवेड्या तरूणाने चक्क स्वतःच्या रक्ताने पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्यक्ष भेटून हे पत्र देणार आहेत.भाजपचे जत विधानासभा निवडणुक प्रमुख तम्मानगौडा रविपाटील यांना 2024 ची विधानासभेची उमेदवारी मिळावी आपल्या रक्ताने चार पानांचे हे पत्र लिहिण्यात आले आहे.

जत तालुक्यातील बिळूर गावचा रहिवासी असलेल्या पिरू कोळी या ध्येयवेड्या तरूणाने हा पराक्रम केला आहे. रविपाटील यांचा कट्टर कार्यकर्ता पिरू कोळी हा तरूण भाजपा विध्यार्थी आघाडीचा सांगली जिल्हा उपाध्यक्ष आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ही पत्रे लिहिली असून चक्क आपल्या रक्ताने सर्व मजकूर लिहिला आहे.

 

त्या पत्रात त्यांनी तम्मनगौडा रवीपाटील यांनी दुष्काळी जनतेसाठी केलेली कामे, मजबूत पक्षबांधणीसाठी दिलेले योगदान यांचा उल्लेख केला आहे. त्यांना आमदार म्हणून जत तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची व तालुक्याचा विकास करण्याची संधी मिळावी अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे.
पेरू कोळी हे स्वतः मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन रक्ताने लिहिलेले पत्र सादर करणार आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here