जत : तुबची बबलेश्वरचे पाणी यतनाळ येथून जत तालुक्यातील तिकोंडी तलावात आले आहे.या पाण्याची महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील अधिकाऱ्यांच्या समवेत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाहणी केली.यावेळी सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी अप्पाराया बिरादार,पिराप्पा माळी,कार्यकारी अभियंता रोहित कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.