जत: जत तालुक्यातील कोसारी येथील सुप्रसिद्ध दुर्गामाता मंदीरासाठी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रविपाटील यांनी एक लाख रुपयांचा निधी दिला.तम्मनगौडा रविपाटील यांची जनकल्याण संवाद पदयात्रा आज शुक्रवारी सकाळी कोसारी येथे झाली.
कोसारी गावचे ग्रामदैवत श्री दुर्गामाता मंदीर आहे. हे सुप्रसिद्ध तिर्थक्षेत्र आहे. असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिराच्या शेजारी एक खोली बांधकाम करण्याचे नियोजन असून त्यासाठी सहकार्य करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.
यावेळी तम्मनगौडा रविपाटील यांनी देवीच्या खोलीसाठी तात्काळ मदतीची घोषणा केली. त्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. श्री दुर्गामाता मंदिरासाठी उदार अंतःकरणाने तम्मनगौडा रविपाटील यांनी एक लाख रुपयांची देणगी दिल्याने सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी माजी सरपंच बापूसाहेब महारनूर, विकास सोसायटी चेअरमन उत्तम महारनूर, माजी उपसरपंच मधुकर भोसले, सोसायटी व्हा. चेअरमन सविता शिंदे, तानाजी चव्हाण, विष्णू कुंभार, ग्रामपंचायत सदस्या कविता पाटील ग्रामपंचायत सदस्या गौरी टेंगले, हनुमान दुध संस्थेचे चेअरमन दादासो महारनूर, भाजपा विद्यार्थी आघाडी जत तालुका अध्यक्ष विशाल महारनूर आदी उपस्थित होते.