जत: भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील जत तालुक्यातील माता-भगिनींचे आयडॉल ठरत आहेत. रक्षाबंधन कालावधीत निघालेल्या त्यांच्या जनकल्याण संवाद पदयात्रेला महिला भगिनींचे प्रचंड प्रतिसाद व आशीर्वाद लाभले आहेत.
महाराष्ट्रातील भाजप सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी संपूर्ण जत तालुक्यात जनकल्याण संवाद पदयात्रा सुरू केली आहे. विशेषत: लाडकी बहीण योजने संदर्भात महिला भगिनींशी संवाद साधने, त्यांच्या अडीअडचणी सोडवून देणे व लाडकी बहीण योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणे हा जनसंवाद पदयात्रेचा प्रमुख हेतू आहे. लाडकी बहीण योजनेची दहा हजारांहून अधिक महिलांची नोंदणी रवी पाटील यांच्या भाजप वार शरूम मधून मोफत करण्यात आली आहे.
हजारो महिलांच्या नोंदणी मधील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र लाडकी बहीण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.तम्मनगौडा रवीपाटील यांचे आजोबा सिद्रामप्पा रवी हे प्रतिवर्षी दिवाळी सणाला पंचक्रोशीतील सर्व माता भगिनींना साडीचोळी आहेर करीत होते. त्यांच्या घराण्याची ही परंपरा रवीपाटील यांनी आता संपूर्ण तालुक्यात राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये राजकारण, निवडणूक असा कोणताही हेतू न ठेवता जत तालुक्यातील एक लाख महिला भगिनींना दरवर्षी रक्षाबंधनाला साडीचोळी आहेर करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.
तम्मनगौडा रवीपाटील हे महिला भगिनींच्या समस्यांसाठी धावून येणारे नेते म्हणून त्यांचा महिला भगिनींकडून मोठ्या प्रमाणात सन्मान होऊ लागला आहे. पदयात्रा ज्या गावातून जात आहे त्या ठिकाणी त्यांचे औक्षण करून राखी बांधून स्वागत केले जात आहे. पदयात्रेच्या पहिल्या टप्प्यात व दुसऱ्या टप्प्यातही हजारो भगिनींनी त्यांना राखी बांधली आहे. माता भगिनींचे एवढे प्रेम मिळालेले ते एकमेव नेते आहेत.
जत तालुक्यातील महिलांकडून गावोगावी उद्योग, व्यवसाय व रोजगार उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. संवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक महिलांनी थेट संवाद यात्रेत ही खंत बोलून दाखवली. शेती व शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी महिलांना स्वतंत्रपणे उद्योग निर्मिती करावी अशी मागणी समोर येत आहे.
तम्मनगौडा रवीपाटील यांनी लवकरच खास महिलांसाठी टेक्सटाइल पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाच्यावतीने जत तालुक्यातील महिलांसाठी 200 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याची त्यांची संकल्पना आहे. जनसंवाद पद यात्रेच्या माध्यमातून जागा व परिसराची चाचणी सुरू करण्यात आली आहे.
जिरग्याळ, मिरवाड, डफळापुर बेळुंखी, हिवरे, अंकले, डोरली, कुंभारी या गावातील महिला भगिनी यांनी उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने येत्या काही दिवसातच पश्चिम भागात टेक्स्टाईल पार्क उभारण्याचे घोषणा रवी पाटील यांनी केली आहे.
जत तालुक्यातील महिला भगिनींचा आयडॉल बनलेल्या रवीपाटील यांना आमदार करण्याची शपथ हिवरे येथील महिलांनी पांडुरंगाच्या मंदिरात घेतली आहे. त्यामुळे भविष्यात तम्मनगौडा रविपाटील यांच्यासारखा लोकप्रतिनिधी असावा अशी जनमानसात तीव्र इच्छा निर्माण झाली आहे.