तालेवार व सावकार घराण्याचे वारसदार | मा.श्री.तम्मनगौडा ईश्वरप्पा रविपाटील (सावकार)

0
जत ही देवभूमी‌.‌. महाशरणी देवी दानम्मा, मलकारसिद्ध अवधूसिद्ध, कुंतीदेवी, सेवरसिध्द, अशा देवतांची जन्मभूमी… याच जतच्या भूमीत उमदीचे संतश्रेष्ठ भाऊसाहेब महाराज, बिळूरचे गुरु बसवेश्वर स्वामीजी, श्री संत बागडे बाबा यांनी अवतार घेतला. क्रांतीसुर्य सिंदूर लक्ष्मण, श्रीमंत अमृतराव डफळे सरकार, कॉम्रेड कल्लाप्पाण्णा होर्ती यांनी याच मातीत क्रांतीचे विजय रोवली…

 

जत ही राष्ट्रपती बी. डी.जत्ती, राजे रामराव, श्रीमंत विजयसिंह राजे अशा नररत्नांची खाण.. अशा या मातृभूमीतील जाडर बोंबलाचे सुप्रसिद्ध तालेवार व सावकार घराणे म्हणजे रवी पाटील घराणे…
या घराण्यातील एक उत्तुंग नेतृत्व म्हणजेच मा. तम्मनगौडा रवीपाटील… उच्चशिक्षित दिलदार युवा नेता… देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांची थेट भेट घेऊन जत तालुक्यातील दुष्काळी जनतेच्या व्यथा मांडणारा संवेदनशील नेता…

 

जत तालुक्यातील तरुणांच्या हातातील ऊस तोडीचा कोयता सुटावा त्यांनी उद्योगी म्हणावे बेरोजगारीचा कलंक पुसून टाकावा यासाठी थेट युरोपीय देशाचे तंत्रज्ञान जतच्या दुष्काळी भूमित आणणारे प्रगल्भ नेतृत्व…

 

भाजपने या युवा नेतृत्वाच्या खांद्यावर जत विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी अत्यंत विश्वासाने सोपवली… आणि त्यांनी मोदी@9 अभियानाच्या माध्यमातून पक्षाची मजबूत बांधणी केली.
त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी सोपविली.  भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, अंतर्गत राष्ट्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालकपद बहाल केले…जत तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला…जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती म्हणून त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली आहे…
जत तालुक्यातील जाडर बोबलादचं रवीपाटील घराणं सामाजिक, राजकीय, धार्मिक, कृषी व व्यापार क्षेत्रातील एक तालेवार घराणं. जतच्या सुप्रसिद्ध डफळे राजघराण्याशी पूर्वापार ऋणानुबंध आहेत. रविपाटील हे जत, मंगळवेढा व सांगोला या तिन्ही तालुक्यात सावकार या नावाने सुपरिचित आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात रवीपाटील घराण्याचे दिग्गज नेते कै. सिद्रामप्पा रवीपाटील यांचे जतचे राजे श्रीमंत विजयसिंह राजे डफळे यांच्याशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते. संपूर्ण तालुक्यात त्यांचा दबदबा होता. 1972 साली जत तालुक्यात महादुष्काळ पडला होता. या भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकरी भिकेकंगाल झाला होता. अशा परिस्थितीत संपूर्ण जत तालुक्यातील शेतकऱ्यांची चारातगई सिद्रामप्पा रवीपाटील यांनी शासनाला भरली होती.
त्याकाळी ही रक्कम दहा लाखांच्या घरात होती. यावरून रवीपाटील घराण्याचे ऐश्वर्य व दानत दिसून येते. असे हे दिलदार, दानशूर, धार्मिक व तालेवार सावकार घराणे संपूर्ण पंचक्रोशीत सणावारापासून अडीअडचणीला प्रत्येकाला सढळ हाताने मदत व दानधर्म करतात. त्यांच्या या स्वभावामुळे सावकार म्हणून त्यांचा लौकिक आहे.
जत तालुक्यातील सुप्रसिद्ध दानम्मादेवी देवस्थान येथील प्रमुख उत्सवापैकी श्री दानम्मादेवी व श्री सोमेश्वर यांचा विवाह सोहळा हा एक असतो. या सोहळ्यासाठी रवीपाटील घराण्याचा मान आहे. महान विभुती श्री सिध्देश्वर महास्वामीजी, श्री संत बागडेबाबा, श्री भाऊसाहेब महाराज, डॉ. अमृतानंद महास्वामीजी, श्री. गुरूलिंग जंगम स्वामीजी, श्री तुकाराम बाबा महाराज अशा संत महात्मे व थोर विभूती यांच्याशी रवी पाटील घराण्याचा स्नेह आहे.
अत्यंत दानशूर व करारी बाणा असलेले कै. सिद्रामाप्पा शिवाप्पा रविपाटील हे तमनगौडा रवीपाटील यांचे आजोबा. जसे राजे श्रीमंत विजयसिंह राजे डफळे व माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. 1972 च्या दुष्काळात संपूर्ण जत तालुक्यातील शेतकऱ्यांची चारातगई भरून त्यांनी आपले दातृत्व स्पष्ट केले होते. जाडर बोबलाद गावचे ते १५ वर्षे सरपंच होते. जिल्हा परिषद स्थापनेपूर्वी लोकल बोर्ड अस्तित्वात होते. पहिला लोकल बोर्डाचे ते सदस्य होते. त्यानंतर स्थापन झालेल्या सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले.
रवी पाटील यांचे वडील श्री. ईश्वरप्पा चनबसप्पा
रविपाटील हेही  सांगली जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले होते. जाडरबोबलाद विकास सोसायटीचे चेअरमन, श्री. गजानन शिक्षण संस्था, जाडरबोबलाद‌चे उपाध्यक्ष , अशी मानाची पदे त्यांनी भूषविली आहेत.
त्यांचे चुलते  कै. पंपू उर्फ शिवाप्पा सिद्रामाप्पा रविपाटील यांनी श्री गजानन शिक्षण संस्था. जाडरबोबलादची स्थापना केली. ते जिल्हा परिषदचे सदस्य व विकास सोसायटीचे चेअरमनही होते.
चुलत भाऊ: श्री. मल्लिकार्जुन चंद्रशेखर रविपाटील, हे जाडबरबोलाद गावचे सरपंच होते.

 

तम्मनगौडा रवीपाटील यांच्या मातोश्री कै. सौ. दानम्मा ईश्वरप्पा रविपाटील यांनी जाडरबोबलादचे सरपंचपद भूषविले आहे. त्यांचे लोकप्रियता एवढी होती ती नुकतेच त्यांचे निधन झाल्यानंतर अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता.अशा या सावकार व वैभव संपन्न घराण्याचे वारसदार ताम्मनगौडा रवीपाटील एक उदयनमुख नेतृत्व म्हणून केवळ जत तालुका व जिल्हा नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर झळकले आहेत…
महिला भगिनींचे आयडाॅल
भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील जत तालुक्यातील माता-भगिनींचे आयडॉल ठरत आहेत. रक्षाबंधन कालावधीत निघालेल्या त्यांच्या जनकल्याण संवाद पदयात्रेला महिला भगिनींचे प्रचंड प्रतिसाद व आशीर्वाद लाभले आहेत.
महाराष्ट्रातील भाजप सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी संपूर्ण जत तालुक्यात जनकल्याण संवाद पदयात्रा सुरू केली आहे. विशेषत: लाडकी बहीण योजने संदर्भात महिला भगिनींशी संवाद साधने, त्यांच्या अडीअडचणी सोडवून देणे व लाडकी बहीण योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणे हा जनसंवाद पदयात्रेचा प्रमुख हेतू आहे. लाडकी बहीण योजनेची दहा हजारांहून अधिक महिलांची नोंदणी रवी पाटील यांच्या भाजप वार रूम मधून मोफत करण्यात आली आहे. हजारो महिलांच्या नोंदणी मधील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र लाडकी बहीण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
जिरग्याळ, मिरवाड, डफळापुर बेळुंखी, हिवरे, अंकले, डोरली, कुंभारी या गावातील महिला भगिनी यांनी उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने येत्या काही दिवसातच पश्चिम भागात टेक्स्टाईल पार्क उभारण्याचे घोषणा रवी पाटील यांनी केली आहे. जत तालुक्यातील महिला भगिनींचा आयडॉल बनलेल्या रवीपाटील यांना आमदार करण्याची शपथ हिवरे येथील महिलांनी पांडुरंगाच्या मंदिरात घेतली आहे. त्यामुळे भविष्यात तम्मनगौडा रविपाटील यांच्यासारखा लोकप्रतिनिधी असावा अशी जनमानसात तीव्र इच्छा निर्माण झाली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.