महिलांना व्यवसायांसाठी मिळणार ५ लाखापर्यत बिनव्याजी कर्ज | वाचा सविस्तर माहिती..

0
20
मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या यशानंतर आता केंद्र सरकारच्या महिलासाठी असणाऱ्या योजना आर्थिक उन्नती देणाऱ्या ठरणार आहेत. महिलांसाठी काही विशेष योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत मिळते.या योजनेच नाव लखपती दीदी असे आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना वेगवेगळे कौशल्य शिकवण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहेत.त्यात ‌अनेक व्यवसाय करण्यासाठी महिलांना पाच लाखापर्यत बिनव्याजी कर्ज़ ही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या योजनेमुळे बचत बटाशीसंबंधित महिलांना फायदा होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेमुळे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेसाठी महिलांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. १८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

मोदी सरकारने १५ ऑगस्ट २०२३ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेत प्रथम महिलांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासोबतच आर्थिक हातभार देखील लावला जातो.या योजनेत महिलांना १ ते ५ लाख रुपये कर्ज दिले जाते. या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज लागत नाही. या योजनेअंतर्गत महिलांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात. तसेच व्यवसाय कसा करायचा याबाबत वेगवेगळ्या आयडीया दिल्या जातात.

या योजनेत महिलांना आर्थिक टीप्स, बिझनेस मार्केटिंग प्लान याबाबत माहिती दिली जाते. याचसोबत ऑनलाइन बँकिंगबाबत माहिती दिली जाते. आतापर्यंत जवळपास ९ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here