रत्नागिरीत अत्याचार करून विद्यार्थिनीला कचऱ्यात फेकले

0
5

रत्नागिरी : परिचारिका म्हणून शिकत असलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी रत्नागिरीत घडली आणि शहर हादरले. परगावाहून आलेल्या तरुणीला गुंगीचे औषध पाजून तिच्यासोबत हा प्रकार करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

 

तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या प्रकारामुळे शासकीय रुग्णालयातील संतप्त परिचारिकांनी काही काळ काम बंद केले. त्यापाठोपाठ असंख्य रत्नागिरीकर रस्त्यावर उतरले आणि जिल्हा रुग्णालयाबाहेर मुख्य रस्ता अडवण्यात आला. अखेर पोलिसांनी कारवाईची हमी दिल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

बदलापूरमध्ये आणि कोलकाता येथील घटना ताज्या असताना हा प्रकार घडल्याने आता रत्नागिरीही सुरक्षित राहिली नाही का, असा प्रश्न करत असंख्य लोक जिल्हा रुग्णालयात जमा झाले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. आरोपी लवकर शोधा, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, असे लोक तावातावाने पोलिसांना सांगत होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here