मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभरात पावसाची रिपरिप सुरू होती. नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाने झोडपले. काही भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. geen. नदी नाल्यांच्या पुरात वाहून गेल्याने दुर्घटनाही घडल्या आहेत. विदर्भ व मराठवाड्याला जोडणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.
कळमनुरी ते शेंबाळपिंपरी (जि. हिंगोली) रस्ता बंद झाल्याने मराठवाडा व विदर्भाचा संपर्क तुटला आहे. आज मुसळधारेचा इशारा ■ पुढील चार ते पाच दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस ■ आज महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील १८ राज्यांत उधार पावसाचा इशारा.हिंगोली शहरात सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील बांगरनगर व जिनमातानगर जलमय झाले होते.