कोल्हापूर : आज आपल्या देशामध्ये अनेक सहकारी संस्था आहेत. युवा पिढीने यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यायला हवा.सहकारी संस्था बळकट करण गरजेचं असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपुदी मुर्मू यांनी केले. राष्ट्रपती द्रौपुदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. वारणानगरमधील उद्योग समूहाच्या विविध कार्यक्रमांना द्रौपुदी मुर्मू यांनी हजेरी लावली.यावेळी त्यांनी वारणा समूहाचे कौतुक केले.राष्ट्रपती द्रौपुदी मुर्मू म्हणाले की,वारणा समूहाच्या सोहळ्याला येण्याचा आनंद आहे. लिज्जत पापड सारखे घराघरात जाणारे ब्रँडचे प्रॉडक्ट इथं बनवले जातात. दुग्ध उत्पादनात वारणा समूह पुढे आहे. राष्ट्रपती म्हणाल्या की, वारणामधील महिला समूहाचा सोहळा पार पडत आहे. महिलांना सामाजिक स्थान वाढवण गरजेचं असून सरकार यासाठी प्रयत्न करत आहे.
अनेक संस्था देखील महिलांसाठी कार्यरत आहेत.आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. महिलांची प्रगती ही देशाच्या उन्नती आणि विकासामध्ये महत्वाची आहे.त्यामुळे महिलांच्या दैनंदिन जीवनात बदल होत आहे. आपल्यासोबत सर्व महिलांना या प्रगतीपथावर आणणे गरजेचं आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर सहकारामुळे देशात येत्या काळात अजून समृद्धी येईल. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी 2021 मध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही सहकार क्षेत्राच्या सुव्यवस्थित आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सहकार धोरण आणण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.सहकारी संस्थांना विविध योजनांतर्गत आर्थिक, तांत्रिक व प्रशिक्षण संबंधित सहाय्य दिले जात आहे. सर्व संस्थांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदीमुर्मू यांनी कार्यक्रमात केले.
कोल्हापूर भारत देश हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून या यशात सहकारक्षेत्राचे महत्त्वाचे योगदान आहे. देशात साडेआठ लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सहकाराची मुळे खूप मजबूत आहेत.पण सहकाराची पूर्ण क्षमता अजूनही वापरली जात नाही.सहकारी संस्थांनीही सेंद्रिय शेती, साठवण क्षमता निर्माण करुन, इको-टुरिझम यांसारख्या नवीन क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदीमुर्मू यांनी केले.
वारणानगर येथे आयोजित श्री वारणा महिला सहकारी उद्योग समुह सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठ उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे, वारणा बँकेचे संचालक निपुन कोरे, सावित्री महिला सहकारी संस्थेच्या संचालक शुभलक्ष्मी कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
वारणानगर(कोल्हापूर) येथे आयोजित श्री वारणा महिला सहकारी उद्योग समुह सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपुदी मुर्मू यांच्याहस्ते संपन्न झाले.यावेळी महिलांनी राष्ट्रपती मुर्मू यांचा सत्कार करण्यात आला.