सुवर्णयोग !

0

सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, राज्याचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि ‘लोकतीर्थ’ या भव्य स्मारकाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात पार पडले.जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून देशाचे विरोधी पक्ष नेते मा.राहुल गांधी यांचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे सप्रेम स्मरण करून सत्कार केला.

 

या लोकार्पण सोहळ्याचे लोकार्पण देशाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राहुलजी गांधी यांनी डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.ज्यावेळी इंदिरा गांधी यांचा निवडणुकीत पराभव झाला होता, तेव्हाही कदमजी त्यांच्या सोबत होते.तसेच कार्यक्रमात स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या समाजकार्यातील योगदानाचा उल्लेख करत, शिक्षण, सहकार,वाणिज्य,वन क्षेत्रात केलेल्या कामांचा उल्लेख केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळावी, यासाठी हे स्मारक उभे करण्यात आल्याचे राहुलजी यांनी नमूद केले.

 

Rate Card

या सोहळ्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे,माजी केंद्रीय कृषी व संरक्षण मंत्री शरदचंद्र पवार,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विधीमंडळ काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार,माजी मंत्री आ. सतेज पाटील,आ.डॉ.विश्वजित कदम,खा.विशालदादा पाटील आणि विविध मान्यवर तसेच स्थानिक नेते व नागरिक लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.