माझ्याविरुद्ध उभे राहून दाखवाच..| छगन भुजबळांचे जरांगेंना आव्हान

0
2
मुंबई : मनोज जरांगेंनी रोज रोज भूमिका बदलू नये. २८८ उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असे बोलताय, तुमच्यात हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे करा, तसेच मनोज जरांगेंनी स्वतः माझ्यासमोर निवडणुकीत उभे राहावे, हे आमचे आव्हान आहे. प्रत्येकवेळी बदलायचे कारण काय? आज उपोषणाला बसतात आणि दुसऱ्या दिवशी उठतात, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

 

 

आता जरांगे मुस्लिमांनाही आरक्षण मागत आहेत. परंतु, मुस्लीम समाजाला २५ वर्षांपूर्वी आरक्षण दिले आहे. इकडे माळी समाज तिकडे बागवान, इकडे खाटीक तिकडे कुरेशी, इकडे कासार तिकडे मण्यार असे मुस्लीम समाजाला आरक्षण दिले आहे. पण माहिती नसलेल्या गोष्टी अर्धवट माहिती असणारे लोक बोलतात, असा टोला भुजबळांनी जरांगेंना लगावला.
येवल्यातून कोणीही विरोधात लढावे
ओबीसींचे आरक्षण आणि त्यांचे संरक्षण करणे हे माझे काम आहे. मग ते सरकारमध्ये काय किंवा रस्त्यावर काय, भुजबळाला या ५७-५८ वर्षात सवयच आहे. येवला मतदारसंघात कुणीही लढावे मी त्याच्याविरोधात एक लाख येईल, मतांनी निवडून असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here