अधिकाऱ्यांचे गाव | १०० पेक्षा जास्त अधिकारी देशभरातील उच्चपदावर कार्यरत | वाचा कशी आहे,तेथील शिक्षण पध्दत

0
21
भोपाळ : मध्य प्रदेशात असे एक गाव आहे जिथे प्रत्येक घरातून किमान एक व्यक्ती सरकारी नोकरीत आहे, तर जवळपास १०० हून अधिक जण देशातील विविध भागात उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहे.धार जिल्ह्यातील पडियाल या गावाने अधिकाऱ्यांचे गाव म्हणून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुर्गम आदिवासी बहुल असलेल्या या गावात ९० टक्क्यांपेक्षा जास्त साक्षरता असून, देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनच गावातील युवकांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यास सुरुवात केली होती.

 

 

पडियाल गावाची लोकसंख्या सुमारे ५,५५० एवढी आहे. या गावातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या भिल्ल समुदायाची आहे.गावातील अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन देशभरात सेवा देत आहेत. प्रत्येक घरांतून किमान एकजण सरकारी कर्मचारी आहे. दोन वर्षांपूर्वी गावातील प्रशासकीय अधिकारी झालेल्यांची संख्या ७० होती. ती वर्ष २०२४ मध्ये शतक पूर्ण करणार आहे.
मुलांचे एक स्वप्न अधिकारी व्हायचेय !
अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ख्याती मिळविलेली पडियालमधील मुले एकच स्वप्न पाहतात, ते म्हणजे अधिकारी होण्याचे. गावातील अनेकजण अमेरिका, मलेशिया, आदी देशांमध्ये अभियंते आहेत. काही जणांनी परदेशात व्यवसाय सुरू केला आहे.
गावकरी आहेत आयपीएस, आयएएस अन् न्यायाधीश…
सरकरी सेवेत असलेल्या गावातील लोकांमध्ये कुणी आयपीएस, आयएस, अभियांत्रिकी, डॉक्टर, वन अधिकरी, तर कुणी वकील अन् न्यायाधीश झालेले आहेत.
शिक्षणावर भर
• गावात एक उच्च माध्यमिक शाळा असून, तेथे २३ शिक्षिक ७०२ विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत स्मार्ट क्लासेस सुरू करण्यात आले आहेत.
● या वर्षी नीटमध्ये ४, जेईई मेनमध्ये ३ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. दरवर्षी असेच प्रमाण असते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here