हिशोब मागितल्याने टाकले वाळीत, १३ जणांविरोधात गुन्हा

0
15
Crime scene barricade covering. Murder case of a criminal young male.
सोसायटीचा हिशोब मागितल्यावरून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आयटी कंपनीच्या संचालकाला वाळीत टाकले. तर तर एकाने पेटत्या दिव्यावर नारळ फोडला. त्यांची क्रूर चेष्टा केली. तसेच, त्यांच्या मुलीबरोबर सोसायटीत कोणीही खेळायला न जाऊ देता कुटुंबावर बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कृत लोकांचे सरंक्षण ३ अंतर्गत सोसायटीच्या १३ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (५०), अश्विनी पंडित (६०), अश्विन लोकरे (५०), सुनिल पवार (५२), जगन्नाथ बुर्ली (५०), अनिरुद्ध काळे (५०), सुमीर मेहता (४७), संजय गोरे (४५), शिल्पा रुपेश जुनावणे (४५), अशोक खरात (५०), वैजनाथ संत (सर्व रा. सुप्रिया टॉवर्स, नागरस रोड, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी सुप्रिया टॉवर्समध्ये २००३ मध्ये फ्लॅट घेतला होता.

 

तो त्यांनी भाड्याने दिला होता. नंतर ते फ्लॅटवर स्वतः राहण्यास आले. ते एका नामांकित आयटी कंपनीचे संचालक आहेत. दरम्यान, त्यांनी या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे हिशोब मागितला. तेव्हा रुपेश जुनावणे यांनी तो दिला नाही. तसेच, नंतर सोसायटीमध्ये राहणाऱ्यांनी हेतुपुरस्पर त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांना बहिष्कृत केले.
वैजनाथ संतने पेटत्या दिव्यावर नारळ फोडला आणि इतर सदस्यांनी त्यांच्या कुटुंबियाची क्रूर चेष्टा केली. त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याच कार्यक्रमात भागही घेऊ दिला नाही. त्यांच्याबाबत दुजाभाव करुन मानसिक त्रास दिला. शिल्पा रुपेश जुनावणे या फ्लॅटचा जोराजोरात दरवाजा वाजवून त्यांच्या मुलीला घाबरवून सोडत असत, अस तक्रारीत म्हटले आहे.
संगनमत करुन दिला त्रास
मुलीबरोबर कोणीही खेळत नाही. फ्लॅट गिळंकृत करावयाचा असल्याने सर्व मिळून संगनमत करुन त्रास देत आहेत. त्यांच्या कुटुंबियांची सोसायटीमध्ये बदनामी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नीला मानसिक त्रासास तोंड द्यावे लागले. पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या मोठ्या रक्कमेचा अपहार केला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here