कोल्हापूरजवळ बोलेरो-ट्रकची भीषण धडकेत ३ ठार,४ गंभीर

0
सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच सरवडे व मांगेवाडी स्मशानभूमीजवळ बोलेरो व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघे जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. मृत सर्वजण सोळांकुर (ता. राधानगरी) गावचे असून, ते गारगोटीहून सोळांकुरकडे येत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. निपाणी-देवगड राज्य महामार्गावर बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की, रस्त्यावर सन्नाटा पसरला होता. अपघातात बोलेरो व ट्रकचे मोठे नुकसान झाले.

 

मृतांमध्ये सोळांकुर येथील शुभम चंद्रकांत धावरे (२८), आकाश आनंदा परीट (२३) आणि रोहन संभाजी लोहार (२४) या तरुणांचा समावेश आहे. अन्य ४ जखमींवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने सोळांकुर परिसरावर शोककळा पसरली आहे. अविवाहित तरुणांवर ऐन गणपती उत्सवात काळाने घाला घातला. ट्रकने एवढी जोरदार धडक दिली की, गाडी व रस्त्यावर रक्त व मासांचा सडा पसरला होता. तर बोलेरो चालक शुभम धावरे याचे डोक धडावेगळे झाले होते.
 घटनास्थळील दृष्य अंगावर शहारे आणणारे होते. राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेबाराच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ पश्चिम वळणावर ट्रक व बोलेरो यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात शुभम धावरे, आकाश परीट, रोहन लोहार (सर्वजण राहणार सोळाकूर) जागीच ठार झाले, तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार गंभीर जखमी झाले.
निपाणी-देवगड रस्त्यासाठी अंदाजे २३० कोटी रुपये खर्च केले आहेत. या रस्त्याचे रुंदीकरण होऊनही रस्त्याच्या दोन्ही हत्ती गवताची मोठ्या प्रमाणावर लागण केली आहे. या हत्ती गवतामुळे समोरुन येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत. तरीही याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. आजच्या अपघातालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष व हत्ती गवत कारणीभूत असल्याचे उपस्थितांतून बोलले जात आहे.
या अपघातानंतर राजेंद्र मोहन लोहार यांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकचालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. परंतु, लोकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
आक्रोशाने रुग्णालय परिसर स्तब्ध

शवविच्छेदन करुन मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थांनी केलेल्या आक्रोशाने रुग्णालय परिसर स्तब्ध झाला. येथील एकाचे दफन तर दोघांचे स्मशानभूमीत जवळजवळ मृतदेह जळत असताना संपूर्ण परिसर गहिवरून गेला होता.या घटनेने गावावर शोककळा पसरली असून, गावात सन्नाटा पसरला आहे. संपूर्ण व्यवहार बंद ठेवून व दुखवटा पाळून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.