पितृपंधरवड्याला बुधवारी १८ सप्टेंबरपासून सुरुवात होत असून, तो २ ऑक्टोबरपर्यंत पाळला जात आहे. या उत्तरादी मठाचे पीठाधीश श्री श्री : : T . १००८ सत्यात्मतीर्थ स्वामी यांच्या साधकांच्या वतीने जुना एम्पलॉमेंट चौकातील दंडवते महाराज मठात 1 पक्षमास कार्यक्रम आयोजित करण्यात 1 । Γ आल्याची माहिती विश्व मध्व महापरिषदेचे अध्यक्ष बी. जी. कुलकर्णी यांनी दिली. दरवर्षाप्रमाणे यंदाही पितृपक्ष मासमध्ये पितृकार्य (श्राद्ध) केले जाते.
काळात पंडित विद्यानिधी आचार्य आणि पंडित संकेताचार्य अग्निहोत्री यांच्या पौरोहित्यखाली श्राद्ध विधी केले जात आहेत.असा असेल पक्षमास कार्यक्रम बुधवार, १८ सप्टेंबर: प्रतिपदा पक्ष, गुरुवार, १९ सप्टेंबर: द्वितीया पक्ष, शुक्रवार, २० सप्टेंबर: तृतीया पक्ष, शनिवार, २१ सप्टेंबर: चतुर्थी पक्ष व महाभरणी श्राद्ध, रविवार, २२ सप्टेंबर: पंचमी पक्ष, सोमवार २३ सप्टेंबर षष्ठी पक्ष, मंगळवार, २४ सप्टेंबर: सप्तमी पक्ष, बुधवार, २५ सप्टेंबर आएमी /शुक्रवार, २७ सप्टेंबर: दशमी पक्ष, शनिवार, २८ सप्टेंबर : एकादशी पक्ष नाही. रविवार, २९ सप्टेंबर: एकादशी व द्वादशी पक्ष, सोमवार, ३० सप्टेंबर: त्रयोदशी पक्ष, मंगळवार, १ ऑक्टोबर: चतुर्दशी पक्ष व घात चतुर्दशी पक्ष, बुधवार, २ ऑक्टोबर सर्वपितृ अमावास्या पक्ष