महाराष्ट्र शासनामार्फत ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ शालेय शिक्षण (पहिली ते बारावी) घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित स्वरूपात राबविण्यात येत आहे. अपघात झालेल्या विद्यार्थ्यांस या योजनेंतर्गत पुढीलप्रमाणे लाभ मिळतील.
१) विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू – रु. १,५०,०००/-,
२) अपघातामुळे कायमचे अपंगत्व (दोन अवयव / दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी) – रु. १,००,०००/-,
३) अपघातामुळे कायमचे अपंगत्व (एक अवयव किंवा एक डोळा निकामी) – रु. ७५,०००/-,
४) अपघातामुळे शस्त्रक्रिया रु. १,००,०००/-.
अपघात झाल्यानंतर दाव्यासाठी पालकाने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत / प्राचार्यांमार्फत विहित नमुन्यात पहिली ते आठवीसाठी शिक्षणाधिकारी (प्रा.) व नववी ते बारावीसाठी शिक्षणाधिकारी (मा.) यांच्याकडे तीन प्रतींमध्ये अर्ज करावेत.