आतेभावाशी बहिणीच्या असलेल्या प्रेमसंबंधास विरोध केल्याने सख्ख्या भावाला त्याच्या आईसह बहीण आणि आतेभावाने संगनमताने घातक हत्याराने मारहाण केली. यात भावाचा मृत्यू झाला. जिवे मारले. यात अरुण नागेश बाविस्कर (वय ३०, रा. बुरझड, ता. धुळे) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आतेभावासह अन्य तिघांविरुद्ध सोनगीर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी आतेभावास सोनगीर पोलिसांनी अटक केली आहे.
मावस भाऊ संदीप धोंडू बाविस्कर (वय २९, रा. बुरझड, ता. जि. धुळे) याने फिर्याद दाखल केली. अरुण नागेश बाविस्कर (वय ३०, रा. बुरझड, ता. जि. धुळे) याची बहीण सुरेखा नागेश बाविस्कर (सुरेखा लाला पवार) (२६) हिचे आणि आतेभाऊ मनोहर लोटन वसईकर ( २९, रा. सुरत) याच्याशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधास अरुण बाविस्कर याचा विरोध होता.
त्यामुळे आतेभाऊ मनोहर वसईकर, बहीण सुरेखा बाविस्कर आणि आई सुमनबाई नागेश बाविस्कर (५२, रा. बुरझड, ता. जि. धुळे) या तिघांनी संगनमताने जिवे मारण्याच्या उद्देशाने काहीतरी हत्याराने अरुण यास मारहाण केली. कशाच्या सहाय्याने तरी गळफास देऊन जिवे मारले.