लैंगिक सुखाची मागणी; ७२ वर्षीय वयोवृद्ध गजाआड

0
9

रवींद्र वार्डमधील ७२ वर्षीय वयोवृद्धाने त्याच्या घरी किरायाने राहात असलेल्या कुटुंबातील अल्पवयीन दोन मुलींकडे लैंगिक सुखाची मागणी केली. ही घटना रविवारी पहाटे उघडकीस आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मुली आपल्या परिवारासह किरायाने राहतात. घरमालकाने त्या दोन्ही मुलींना पैसे दिले होते. घर मालकाने त्या दोन्ही मुलींना पैशाच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी केल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात करण्यात आली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम ७५ (१), ७५ (१) (२), ७५ (२), ३३२ (क) भारतीय न्याय संहिता सहकलम ८,१२ लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मीनल कापगते करीत आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here