विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचं आव्हान?

0
11

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्यांत असलेल्या सहा प्रमुख पक्षांव्यतिरिक्त महाराष्ट्रात आता अनेक उपप्रादेशिक पक्षसुद्धा निर्माण झालेले आहेत. हे पक्ष एखादा जिल्हा किंवा तालुक्यापुरते सीमित आहेत. या उपप्रादेशिक पक्षांचे प्रभावक्षेत्र जरी छोटे असले तरी हे पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतील यात शंका नाही. ही विधानसभा निवडणूक एवढी अटीतटीची होणार आहे की दोन- चार आमदार संख्यासुद्धा ऐनवेळी महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच या उपप्रादेशिक पक्षांची आता खास दखल घ्यावी लागत आहे. या पक्षांत आमदार बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वराज्य संघटना प्रमुख संभाजीराजे असे अनेक पक्ष आहेत. या पक्षांव्यतिरिक्त प्रकाश आंबेडकरांची ‘वंचित बहुजन आघाडी’, ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर,भारतीय जवान किसान पार्टीचे नारायण अंकुशे हे नेते आहेत. हे नेते एकत्र येऊन राज्यात ‘तिसरी आघाडी’ स्थापन करण्याच्या च्या विचारात आहेत. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील ओला दुष्काळ भागाचा एकत्रित दौरासुद्धा केला होता.

राज्यात तिसऱ्या आघाडीचीचा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकां दरम्यानही होती.मात्र तेव्हा चर्चेच गुराळ अखेरपर्यंत चालू राहिलं आणि प्रत्यक्षात काही घडलंच नाही.त्यावेळी संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेमार्फत लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या सर्व जागा लढविणार असे जाहीर केले होते. मात्र जेव्हा त्यांच्या वडिलांना म्हणजे‌ छत्रपती शाहू महाराजांना ‘मविआ’ने उमेदवारी जाहीर केली तेव्हा त्यांनी माघार घेतली होती. तेव्हा अशाप्रकारचे राजकारण बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा खेळून बघितले होते, ‘वंचित’ची ‘मविआ’शी बोलणी फिस्कटल्यावर काही मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार देण्याचा तर काही ठिकाणी योग्य उमेदवाराला पाठिंबा देण्याचा डाव खेळून बघितला,यात ‘वंचित’ला फारसे यश मिळाले नाही.१ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे दलित समाजात खळबळ माजली आहे.
दलित समाजातील वरचढ जाती उपवर्गीकरणाला विरोध करत आहेत, तिकडे ओबीसींना मराठा आरक्षणाची भीती आहेच, याचा अंदाज आल्यामुळे बाळासाहेबांनी ओबीसी, एससी, एसटी यांना एका झेंड्याखाली आणण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात सप्टेंबर रोजी त्यांनी एका पत्रकार परिषदेत घोषणा केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर गोडवाना गणतंत्र पक्षाचे तुलेशराम मरकाम, भारत आदिवासी पक्षाचे सुनील गायकवाड, कोलम आदिम जमात संधाचे माधवं टेकाम वगैरे आदिवासी समाजाचे नेते होते. येत्या ३० सप्टेंवर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ही मंडळी नागपुर, जळगाव  मनमाड येथे जाहीर सभा आयोजित करणार आहे. आदिवासी समाजासाठी आरक्षित असलेल्या विधान सभा जागांव्यतिरिक्त सुमारे २० जागा अशा आहेत की जेथे आदिवासी मतदारांची लोकसंख्या १५ ते ३० टक्के आहे.
याचा अर्थ आदिवासी समाजाच्या हातात सुमारे ४४ जागा आहेत. याचा अर्थ असा की आदिवासी उमेदवार बिगर आदिवासी मतदारसंघातून निवडणूक लढवतील. आंबेडकरांची ही नवीन व्यूहरचना किती यशस्वी होते हे लवकरच दिसेल, बाळासाहेब आंबेडकरांप्रमाणेच लोकसभा निवडणुका दरम्यान बच्चू कडूंची भूमिका संदिग्ध होती.तसं पाहिलं तर त्यांचा पक्ष महायुतीचा घटक पक्ष होता. तरीही त्यांनी काही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला होता. हे तपशील चर्चेतले तर लक्षात येते.में २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत या उपप्रादेशिक पक्षांनी स्वतंत्र भूमिका घेऊन बघितली. यात त्यांना काहीही फायदा झाला नाही, म्हणून आता ते ‘तिसरी आघाडी’ बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. या चित्रात मनोज जरांगे याचा, वेगळा विचार करावा लागतो. ‘मराठा आरक्षण जर प्रत्यक्षात आले नाही तर आमही विधानसभा निवडणुका लढवू आणि सर्व म्हणजे २८८ जागांचा उमेदवार देऊ, असे त्यांनी जुलैमध्ये जाहीर केलेले आहेच, आरक्षणाच्या मागणीने महाराष्ट्रातील मराठा समाजात एकीची भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात मराठा समाज एकूण लोकसंख्येच्या ३३ टक्के आहे.लोकसभा निवडणुकांत मराठा समाजाच्या रागाचा फटका राज्यातील सत्तारूढ आघाडीला बसला होताच, सत्तारूद्ध महायुतीला ४८ पैकी फक्त १७ जागा जिंकता आल्या तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख जात माणून मराठा समाजाकडे प्रत्येक पक्षाला लक्ष द्यावेच लागते. यात आता आरक्षणाचा मुद्दा जबरदस्त तापल्यामुळे निवडणुकांबद्दल भाकीत करणं फार अवघड आहे. जरांगे पाटलांप्रमाणे छत्रपतींची स्वराज्य संघटनेने आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. दुसऱ्या टोकाला बाळासाहेब आंबेडकरसुद्धा सक्रिय झाले असून त्यांना ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींची मोट बांधायची आहे. यासाठी बाळासाहेबांनी ‘आरक्षण बचाव यात्रा’ काढली. मात्र ‘वंचित’ला २०१९ च्या विधानसभा निवडणुकांत एकही जागा जिंकता आली नव्हती हेही लक्षात घेतले पाहिजे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here