सांगलीतील 125 वर्षे जून्या गणेश मंडळाची 70 वर्षानंतर यंदा भव्य मिरवणूकीने जून्या आठवणी जाग्या

0

तब्बल १२५ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या सांगलीतील गाव भागातील प्रसिद्ध सांभारे गणेश मंदिरातील ‘श्रीं’ च्या भव्य मिरवणुक ७० वर्षानंतर‌ यंदापासून सुरू झाली आहे.अंनतचतुर्थीला ही भव्य मिरवणूक सांगलीत काढण्यात आली.या मिरवणूकीस खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ,आदित्यराजे पटवर्धन, सांभारे परिवार यांच्यासह भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सांगलीच्या पटवर्धन संस्थानचे राजवैद्य आबासाहेब सांभारे यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून १८९९ साली सांगली येथे त्यांच्या गावभागातील वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यांनी वाड्यातच सुंदर गणेश मंदिर बांधून १४ फूट उंच व ९ फूट रुंद अशी पांगेरीच्या लाकडापासून बनविलेल्या भव्य व सुंदर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली.सुमारे दीड टन वजनाच्या या गणेशमूर्तीची १९५२ मध्ये बंद झालेली मिरवणूक ७० वर्षांनंतर यंदा अनंत चतुर्दशी दिवशी पारंपरिक वादयांच्या गजरात काढण्यात आली. या मिरवणुकीत सहभागी होऊन मन आनंदित झाले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.