जत विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवि- पाटील यांचे समर्थक आसंगी तुर्कचे सरपंच मीरासाब मुजावर मीरासाब मुजावर यांची जत विधानसभा अल्पसंख्यांक मोर्चाच्या संयोजकपदी निवड करण्यात आली.
मीरासाब मुजावर यांनी गेले काही महिने भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. -महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश सचिव फारुक जमादार यांनी ही निवड घोषित केली. मुजावर यांनी – पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहण्याची – ग्वाही दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य -अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव फारुक जमादार, विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रविपाटील, आजम मकानदार, पप्पू अत्तार, ऋषी टकले, माजी सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील, – रामचंद्र हत्तळी-पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.