पोटच्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला न्यायालयाने १२ वर्षांचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.जन्मदात्या बापानेच १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यातून पीडिता गर्भवती राहिली होती. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात १९ ऑक्टोबर २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला होता. अतिरिक्त सहजिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी शुक्रवारी निकाल दिला.
पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिली होती. पीडित मुलीची आजी कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. मुलीला एक भाऊदेखील आहे. १० ऑक्टोबर २०२२ रोजी पीडित मुलीने आजीला पोट खूपच दुखत असल्याचे सांगितले. तिला रुग्णालयात नेल्यानंतर प्रकरणाला वाचा फुटली.शहर पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक बारकू जाणे यांनी घटनेचा तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी अभियोक्ता संजय वाकचौरे यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. त्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.