संख : जालिहाळ खुर्द (ता. जत) येथे भरदिवसा तलवारीचा धाक दाखवून हरिबा निवृत्ती जावीर या पशुपालकाच्या १३ शेळ्या-बोकडांची जबरदस्तीने चोरी करण्यात आली. दीड लाखांच्या शेळ्या-बोकड चोरून नेलेत. जालिहाळ घोणसगी रस्त्यावर शनिवारी (ता. २१) दुपारी पावणेदोन वाजता ही घटना गावाजवळ घडलो. उमदी पोलिस ताण्यात माहिती देण्यात आली. मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे पोलिसांतून सांगण्यात आले.
पूर्व भागातील जालिहाळ खुर्द वैधील हरिबा जावीर पशुपालक आहेत. शनिवारी ते शेळ्या-मेंढया घेऊन गावाच्या दक्षिण भावला गायराहातील * वनीकरणात रस्त्याकडेला चरायला घेऊन गेले होते. दुपारी दीडच्या आसपास चारचाकीतून आलेल्या पाच • जागांच्या टोळीने हरिबा जावीर यास तलवारीचा धाक दाखवला.
सर्व शेळ्या-मेक्पांना एकत्र कराम्यास सांगून चोरट्याने चारचाकी वाहनाजवळ गहू व मका टाकला. शेळ्या-मेल्या एकत्र आल्यानंतर तीन बोकड, सहा मोठ्या शेळ्या व चार पिल्ले वाहनात टाकून पलायन केले, वाहन वर्नाटकाच्या दिशेने विजापूर दरीबहवी रस्त्याने निघून गेले. दहा मिनिटांत बोरोचा प्रकार घडला.
चोरट्यांनी रस्त्यावरून चारचाकी वाहन फिलवून टेहळणी केली. वनीकरणात घटना घडल्याने रस्त्यावरून ये-जा करणान्यांना कळले नाही.हरिया जावीर भाबरल्याने त्यांनी आरडाओरडा केला नाही. ही माहिती गावात येऊन त्याने ग्रामस्थांना सांगितली. ग्रामस्थांनी मुलगा ग्रामपंचायत सदस्य संभाजी जावीर यांना सांगितले तत्काळ त्यांनी वाहनाच्या दिशेने जाऊन कर्नाटकातील घोणसंगी (ता. तिकोटा) येथील चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कोणत्या बाजूला बाहुन गेले, याची तपासणी केली.
ते वाहन कर्नाटकातील विजापूरकडे गेल्याचे दिसले उमदी पोलिस ठाण्याला पाच वाजता माहिती देण्यात आली. रविवारी हवालदार संजय पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले, आज पशुपालक व त्यांच्या मुलांनी विजापूर येथील शेळ्या मेळयाच्या आठवडा बाजारात जाऊन तपास केल्य परंतु, हाती काहीच लागले नाही.