पंतप्रधानपदाची अनेक वेळा ऑफर मिळाली : गडकरी 

0
5

मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर अनेक वेळा पंतप्रधानपदाच्या ऑफर मिळाल्या होत्या, असा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केला. गडकरींनी येथील एका नियतकालिकाच्या परिषदेत यासंदर्भात विधान केले. पंतप्रधानपद स्वीकारण्यास तयार असाल तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती, या पूर्वीच्या टिप्पणीबद्दल तपशील सांगता येईल का, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले ‘मला अश्या ऑफर अनेकदा आल्या आहेत, अगदी लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतरही.

जूनमध्ये लोकसभेच्या निकालानंतर पंतप्रधान होण्याच्या ऑफर आल्या आहेत का, असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला असता त्यांनी प्रश्न टाळला आणि त्याचा अन्वयार्थ लावण्याचे काम त्यांनी माध्यमांवर सोडले. “मी माझ्या विचारसरणीशी तडजोड करणार नाही. ऑफर स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पंतप्रधान होणे हे माझे ध्येय नाही.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here