सांगली : माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत जिल्हा परिषद सांगली चा राज्यात प्रथम क्रमांक आला असून जिल्हा परिषद सांगली अंतर्गत 16 ग्रामपंचायतीने देखील यश मिळवलेले आहे. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत जिल्हा परिषद सांगली वतीने प्रथमपासूनच योग्य रीतीने नियोजन करून जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत मध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वच उपक्रमाची अंमलबजावणी केली होती.10000 च्या वर लोकसंख्या असणाऱ्या गटात वाळवा तालुक्यातील कासेगाव ग्रामपंचायत चा राज्यात तिसरा क्रमांक आला असून तासगाव तालुक्यातील येळावी व मिरज तालुक्यातील कवलापूर ग्रामपंचायतचा विभागात नंबर आला आहे .
5000-10000 लोकसंख्या गटात वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ग्रामपंचायतचा राज्यात प्रथम क्रमांक आला असुन भुमी या थिमॅटिक विभागात देखील प्रथम क्रमांक आला आहे.वाळवा तालुक्यातील वाटेगाव ग्रामपंचायतीस तसेच मिरज तालुक्यातील समडोळी ग्रामपंचायतीस राज्यस्तरावर उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले आहे..पलूस तालुक्यातील वसगडे व नागठाणे ग्रामपंचायत विभागातील बक्षीस मिळाले आहे.2500-5000 या लोकसंख्या गटात कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे ग्रामपंचायत राज्यात प्रथम क्रमांक आला असून भुमी या थिमॅटिक विभागात प्रथम क्रमांक आला आहे.विभागात कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगाव व घाटनांद्रे ग्रामपंचायतीस बक्षीस प्राप्त झाले आहे.
1500-2500 या लोकसंख्या गटात कवठे महांकाळ तालुक्यातील लंगरपेठ या ग्रामपंचायत राज्यस्तरावर उत्तेजनार्थ तसेच विभागात बनेवाडी व पलुस तालुक्यातील खंडोबाची वाडी ग्रामपंचायत बक्षीस प्राप्त झाले आहे.1500 पेक्षा खालील लोकसंख्या गटात जिल्ह्यातील कुंडलापूर व कौलगे ग्रामपंचायतीस विभागातील बक्षीस प्राप्त झाले आहे .सांगली जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीस ९ कोटी २० लाखाचे पुरस्कार मिळाले आहेत.
जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली.व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यशस्वी कामगिरी केली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषद सांगली व बक्षीस पात्र सर्व ग्रामपंचायतचा सन्मान करण्यात येणार आहे