कर्नाटकचे मुख्यमंत्री सोमवारी गुड्डापूरात, भव्य कार्यक्रमाचे आयोजन

0
5
जत : कर्नाटक-महाराष्ट्र गडी प्रदेश विकास प्राधिकरण आणि कन्नड संस्कृती विभाग कर्नाटक राज्य यांच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने गुड्डापूर येथे सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी कर्नाटक राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे जत तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहे.या अनुषंगाने जतेत पत्रकार परिषदेत घेतली.
या दौऱ्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील सांस्कृतिक आणि विकासात्मक संबंध अधिक वृद्धिंगत होतील असा विश्वास यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केला.याप्रसंगी कर्नाटक गडीनाडू विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सोमाण्णा बिवीनमरद, सचिव प्रकाश मत्तीहळी, आणि चंद्रशेखर गोब्बी व इतर मान्यवर उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here