जिरग्याळात कामगाराकडून ८० हजारांची चोरी

0
22
जत : जत तालुक्यातील जिरग्याळ येथे मारुती हुल्याप्पा पाटील यांच्या महालिंगेश्वर दूध डेअरी व चिलिंग सेंटरमध्ये कामगारानेच ८० हजार रुपये चोरी केल्याची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी डेअरी चालक मारुती पाटील यांनी जत पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा फिर्याद दिली आहे.
दाखल तक्रारीनुसार कामगार प्रांजल येळे (सध्या रा. जिरग्याळ) याने जिग्याळ गावी महालिंगेश्वर दूध डेअरी व चिलिंग सेंटरचे डेअरीच्या आतील व बाहेरील तीन सीसीटीव्ही कॅमेरे फोडून व वायरी तोडून नुकसान केले. शटरचे कुलूप चावीने काढून आत प्रवेश केला. त्यानंतर ड्रॉव्हर फोडून त्यातील ८० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
मारुती पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here