जत : जत शहरातील राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले.या महामार्गाच्या बांधकामाच्या प्रारंभापासूनच डिव्हायडर बसवण्याची मागणी आपण केली होती. परंतु केंद्र सरकारच्या पूर्णतः दुर्लक्षामुळे आतापर्यंत सात निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे जनतेत तीव्र संताप उसळला आहे. याठिकाणी त्वरित डिव्हायडर बसवावे.
यासाठी आता शासन दरबारी कठोर पाठपुरावा करणार आहे. लवकरात लवकर हा प्रश्न सोडवला नाही तर अधिक तीव्र आंदोलन केले जाईल अशी कडक भूमिका आमदार विक्रमसिंह सावंत यांनी घेतली.तसेच ट्राफिक पोलीस तैनात करावे अशी सूचना स्थानिक पोलीस प्रशासनाला आ.सावंत यांनी दिली.