बेंगलोरमध्ये नोकरीस असणाऱ्या सिंदूरमधिल उच्चशिक्षित तरुणाचा संशयास्पद मृत्यू ?

0
5
जत तालुक्यातील सिंदूर येथील २६ वर्षीय रामगोंडा परगोंडा पाटील या युवकाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह घराजवळच मिळून आला. ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. शवविच्छेदनात पोटात विष गेल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असला तरी परिसरात संशयास्पद मृत्यू झाल्याची चर्चा आहे. मयत रामगोंडा हा उच्चशिक्षित होता.बेंगलोर येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी तो सुट्टी घेऊन गावी आला होता. रविवारी कामावर जातो असे सांगून तो घरातून निघून गेला. तो बेंगलोरला गेला असे समजून घरातील लोक नेहमीची कामे करत होते. सोमवारी सकाळी त्यांच्याच शेतात मका काढण्यासाठी शेतमजूर गेले होते. काम करत असताना त्यांना मक्याच्या पिकात सडलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.
त्यांनी घरी माहिती दिली. त्यानंतर या घटनेची माहिती जत पोलिसांना देण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जतच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.मात्र ओळख पटत नसल्याने सायंकाळपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नाही. अखेर सायंकाळी नातेवाईक आल्यानंतर ओळख पटली. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.
खुनाची चर्चा
मृत रामगोंडा याचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळून आला त्यावरुन गावात ही आत्महत्या नसून खूनच झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. नेमका काय प्रकार आहे याचा तपास करण्याचे आव्हान जत पोलिसांपुढे आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here