अनुसूचित जातीमधील मातंग समाजाचा विकास होण्यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे समाजातील विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचे मोफत कौशल्य विकास योजना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याकरिता विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी मंडळाकडे प्रस्ताव पाठविलेले आहेत. विद्यार्थ्यांना मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. कौशल्य प्रशिक्षणातून मुले-मुली स्वतः उद्योगही उभारणी करू शकणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी महामंडळाकडे अर्ज करावा, असे आवाहन केले आहे.
तीन महिन्यांचे मिळणार मोफत प्रशिक्षण
प्रशिक्षण रोजगारासाठी स्किल डेव्हलपमेंट असलेली फळी उभी करण्याकरिता शासनाने इलेक्ट्रिशन, वेल्डर, कारचालक तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षण समाजातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी योजना आणलेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे तीन महिन्यांचे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. या योजनचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण मिळणार :
स्वतः कोणता व्यवसाय निवडायचा. वेल्डर, फिटर, वाहनचालक, तसेच विविध स्किल डेव्हलपमेंटचे विषय त्यात देण्यात आलेले आहेत. आपल्याला आवश्यक असलेल्या प्रशिक्षणासाठी आपण अर्ज करायचा आहे.
असा अर्ज करावा :
■ रोजगाराविषयी स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करावा.
■ तुम्ही शिक्षण घेतलेल्या मूळ कागदपत्रांसह अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या पोर्टलवर स्किल डेव्हलपमेंटसाठी अर्ज करायचा आहे.