सीए म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आणि गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. त्याने त्याच्या फेसबुक लाइव्हमध्ये हा आरोप केला आहे की त्याच्या होणाऱ्या पत्नीने आणि तिच्या कुटुंबाने त्याला मारहाण केली होती आणि तिचा पाठलाग केल्याच्या प्रकरणात, तसंच छेड काढल्याच्या प्रकरणात तुला अडकवू असे सांगितले होते. तसेच १२ लाख ५० हजार रुपये माझ्याकडून उकळले होते.
या सगळ्या ताणातून आयुष्य संपवत असल्याचे त्याने म्हटले आहे. गोवंडी येथे राहणाऱ्या संदीप पासवान (३३) असे आत्महत्या करणाऱ्या सीएचे नाव आहे. दरम्यान, फेसबुक लाइव्ह पाहणाऱ्या लोकांनी याबाबत पोलिसांनाही माहिती दिली होती. मात्र पोलीस त्याच्या घरी पोहचले तोपर्यंत त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. १९ सप्टेंबरला ही घटना घडली.मुंबई पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार संदीप पासवान आणि त्याच्या होणाऱ्या बायकोशी आणि तिच्या कुटुंबाशी मागच्या एक ते दीड वर्षापासून वाद सुरु होता