उंच उडी गुणांकात पलूस ठरले अव्वल

0
9
पलूस ; पलूस नगरपरिषद, पलूस माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये पलूस नगरपरिषदेने राज्यस्तरावरील उंच उडी गुणांकात प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीसाठी नगरपरिषदेला १ कोटीचे बक्षिस मिळणार आहे.
पलूस नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये सहभाग घेतला होता. या अभियानांतर्गत गेली वर्षभर नगरपरिषदेने विविध उपक्रम राबविले होते. त्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक निर्मुलन, कचरा संकलन, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन हे उपक्रम राबविले होते.
नगरपरिषदेने उच्चतम कामगिरी केल्यामुळे शुक्रवारी (दि. २८) महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झालेल्या निकालामध्ये पलूस नगरपरिषदेने २५ ते ५० हजार लोकसंख्या शहरात उंच उडी पात्रतेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीसाठी पलूस नगरपरिषदेला १ कोटीचे बक्षिस मिळणार आहे.
या कामगिरीसाठी पलूस नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी निर्मला राशिनकर-यमगर, आरोग्य विभाग प्रमुख मानसी कदम, नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी, शहरातील पदाधिकारी, ग्रामस्थ, संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या अभियानात पलूस नगरपरिषद मोठ्या उत्साहाने सहभाग घेवून पलूस शहरासाठी उच्चतम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करेल.
– निर्मला राशिनकर-यमगर
प्रशासक तथा मुख्याधिकारी पलूस नगरपरिषद पलूस
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here