स्व.पतंगराव कदम यांच्या पावलावर पाऊल ठेवत, राज्याचे माजी मंत्री आ. डॉ. विश्वजित कदम यांच्या हातात हात घालून जतचे विद्यमान आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत यांची दमदार वाटचाल सूरु आहे. जतचे प्रश्न सुटले पाहिजे, जतचा कायापालट झाला पाहीजे, जतला भरीव निधी मिळाला पाहिजे यासाठी एकाबाजूला आ. विक्रमसिंह सावंत यांचा शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असतो तर दुसऱ्या बाजूला जतकरांच्या प्रश्नांसाठी ते रस्त्यावरही उतरण्यास मागे पुढे पाहत नाहीत.संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेनुसार सांगली,सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक मतदार संघाचे प्रश्न विचारण्याचा विक्रम आ.विक्रमसिंह सावंत यांनी केल्याचे नमूद झाले आहे.
सर्वेमधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आ. सावंत यांनी २१४ प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले.संपूर्ण जत तालुक्यात त्यांची पाणीदार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. विधानसभेत आ. विक्रमसिंह यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे जतचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.यामध्ये विशेषतःतालुक्यातील महसूल, शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसंपदा, सहकार, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी समाज व जत नगर परिषदेच्या प्रलंबित मागण्यांचे प्रश्न आवर्जून उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशनात जतच्या प्रश्नाबाबत आ. सावंत यांनी आक्रमक भूमिका मांडत जतचा आवाज विधानसभेत घुमविला.
जत तालुका म्हणजे महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्टीने सर्वात मोठ्या तालुक्यांपैकी एक,शिवाय महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा २८८ वा मतदार संघ. पण या मतदारसंघात सर्वात जास्त भेडसावणारी आणि उणीव भासणारी गरज ती म्हणजे पाणी. यासाठी विधानसभेत कायम दुष्काळाचा कलंक माथी असलेल्या जत तालुक्यात यंदा सुद्धा भयावह दुष्काळ पडलेला असताना शासनाने जाणूनबुजून जत तालुका दुष्काळी तालुका जाहीर केला नाही. जतला वेगळा न्याय तर शिराळा तालुक्याला वेगळा न्याय दिला जातो. जतवर नेमका अन्याय का केला ला जातो असा सवाल उपस्थित करत नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी शासनाला धारेवर धरले. त्यानंतर जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करताना शासनाने कसा पद्धतीने दुजाभाव केला याचा लेखाजोखाच आ. सावंत यांनी सभागृहात मांडला.
जतच्या तुलनेत शिराळा सुजलाम सुफलाम असताना शिराळा तालुका दुष्काळी तालुका जाहीर होतो पण जत तालुका दुष्काळी तालुका जाहीर केला जात नाही. पश्चिम महाराष्ट्रात जत तालुका असल्याने जतवर हे शासन अन्याय करू पाहत आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात असल्याचा बाबीकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. जतवर शासन कसा अन्याय करत आहे याचा पाढाच त्यांनी सभागृहात मांडताना जत तालुक्याला जलसंपदा विभागाकडून एक रुपयाही निधी मिळाला नसल्याचे ठणकावून सभागृहात सांगितले, सरकारला सुनावले.मुंबईतील संपर्क संस्थेने अधिवेशनांमधील प्रश्नांचा अभ्यास अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. विषयनिहाय प्रश्नांचा अभ्यासही मांडला आहे. जिल्ह्यातील आमदारांनी आरोग्य व शेतीसंदर्भातील प्रश्न सर्वाधिक मांडले. सांगली,कोल्हापूर,सातारा या तिन्ही जिल्ह्यात सार्वधिक प्रश्न सांगली जिल्हातील जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सर्वात जास्त म्हणजेच २१४ प्रश्न मांडल्याचे सर्वे मधून स्पष्ट झाले आहे.
या प्रश्नांवर आ.सावंत यांनी टाकला प्रकाशझोत
रखडलेल्या म्हैसाळ योजनेला निधी द्यावा, जत पूर्व भागातील ६५ गावासाठी वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेला दुसऱ्या टप्प्यातील निविदा प्रसिद्ध करून या योजनेला निधी द्यावा.
★ जत पूर्व भागातील ४४ गावांना कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी जतला मिळावे यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यात आंतरराज्य करार करावा.★ जत तालुका दुष्काळी तालुका जाहीर करावा,★ पावसाळ्यात महापूराचे वाहून जाणारे पाणी जतला वळवावे व तालुक्यातील तलाव, बंधारे भरावेत.
★ जत व माडग्याळ ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याचबरोबर शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत.★ राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी आ. विक्रमसिंह सावंत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेवून केली होती.★ जत किंवा माडग्याळला ट्रामा केअर सेंटर सुरू करावे.
★ मागेल त्याला शेततळे त्याचबरोबरच शेततळ्याचा कागद द्यावा ★ प्रलंबित पीक विमा रक्कम, रखडलेले अनुदान तात्काळ द्यावे.★ मनुक्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा.★ ड्रॅगन फ्रुटचा समावेश मनरेगामध्ये करावा★ माडग्याळी मेंढी संशोधन केंद्र माडग्याळ येथे सुरू करावे.★ एक रुपयात पशुधन पीक विमा सुरू करावा.★ लम्पीतील मृत जनावरांच्या मालकांना वाढीव नुकसान भरपाई मिळावी.★ समग्र शिक्षा अभियानांतर्गत काम करणाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, शासकीय योजनेचा लाभ मिळावा.★ कष्टकरी, शेतकरी, नोकरदार यांच्या प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्यास आ. सावंत यांनी भाग पाडले.
कोणत्या आमदारांनी किती प्रश्न मांडले
विक्रमसिंह सावंत – काँग्रेस – २१४
विश्वजित कदम – काँग्रेस – १४१
जयंत पाटील – राष्ट्रवादी (श.प ) – २०४
मानसिंगराव नाईक- राष्ट्रवादी (श.प ) – २२
सुमन पाटील – राष्ट्रवादी (श.प ) – १२६
अनिल बाबर – शिवसेना (शिंदे गट ) – ६७
सुरेश खाडे – भाजपा – १
सुधीर गाडगीळ – भाजप – ०