जत : तालुक्यातील गरजू तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी या उदात्त हेतूने सुरक्षा नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे तरी उद्या रविवारी दि.६ ऑक्टोंबर पासून १० ऑक्टोबर पर्यंत प्रकाशराव जमदाडे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रासह उपस्थित रहावे,असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
जमदाडे म्हणाले,प्रकाशराव जमदाडे युथ फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यात गेल्या दहा वर्षापासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. नुकतेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात सायकल वाटप, गरजू कुटुंबांना घरगुती वापराची पिठाची चिक्की,(गिरण)उपलब्ध करून दिली आहे. तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे म्हणून भारत सरकारच्या पसारा कायद्यांतर्गत असलेल्या एस. एस .सिक्युरिटी प्रा. लिमिटेड व प्रकाशराव जमदाडे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने कायमस्वरूपी सुरक्षा नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सदरचा मेळावा रविवार दिनांक ६ ऑक्टोबर पासून ते १० ऑक्टोंबर पर्यंत, प्रकाशराव जमदाडे युथ फाऊंडेशन जनसंपर्क कार्यालय पोलीस स्टेशन पाठीमागील कार्यालयात इच्छुक तरुणांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रासह उपस्थित राहून या मेळाव्याचे लाभ घ्यावा. या मेळाव्यात नियमांचे पालन केले जाणार आहे तरी जत तालुक्यातील तरुणांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.