जत : वाळेखिंडी (ता. जत) येथे नवरात्र उत्सवानिमित्त उपवास केलेल्या महिलांनी शुक्रवारी शिजवलेली भगर खाल्ली. त्यातील अंदाजे ३५ महिलांना त्रास सुरू झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
यात प्रामुख्याने उलटी, मळमळ, चक्कर येणे, अंग थरथरणे, थंडी वाजणे यासारखी लक्षणे दिसून आली.उपचारानंतर सर्व महिलांची स्थिती चांगली आहे. परंतु एका महिलेस रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास जता येथे नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दरम्यान, जत येथेही काही महिलांना त्रास झाल्याची चर्चा सोशला मीडियावर सुरू होती, मात्र अधिकृत माहिती मिळाली नाही. याबाबत जता आरोग्य विभागाशी संपर्क होऊ शकला नाही.