जत : बोर्गी बुद्रक (ता. जत) येथील एका कृषी सेवा केंद्रात कृषी विभाग सांगली अंतर्गत जिल्हा गुण नियंत्रण अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यात बंदी असलेल्या नेट्रो बेंझिन या कीटकनाशकाच्या १६० बाटल्या ताब्यात घेतल्या. सुमारे ९२ हजार ६३०
किमतीचा साठा जप्त केला. ही कारवाई जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम व जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी संतोष चौधरी यांनी केली.
बसवेश्वर कृषी सेवा केंद्राचे मालक विनोदकुमार सोमनिंग हलकुडे (वय ४०) व कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा छापा २८ सप्टेंबर २०२४ रोजी टाकण्यात आला होता.
गुण नियंत्रण कक्षाचे निरीक्षक संतोष चौधरी व तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी २८ सप्टेंबर रोजी बोर्गी येथील बसवेश्वर केंद्रावर छापा टाकला. कृषी केंद्राची तपासणीत बाटल्यांचा पंचनामा करून शंका निर्माण झाल्याने तीन बाटल्या एका कंपनीच्या असल्याचे दिसून आले. याचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठवला होता.