सांगली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये महालोकअदालतचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच आयोजन करण्यात आले. या लोकअदालतमध्ये सांगली जिल्ह्यातील एकूण 1 हजार 945 प्रकरणे निकाली करण्यात आली व एकूण 31 कोटी 60 लाख 25 हजार 102 रूपये इतक्या रक्कमेची वसूली करण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक यांनी दिली.
लोकअदालतच्या दिवशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के. शर्मा, जिल्हा न्यायाधीश क्र. 1 व्ही. डी. निंबाळकर, जिल्हा न्यायाधीश क्र. 2 पी. बी. जाधव व तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्र.1 श्रीमती. एम.एस. काकडे उपस्थित होते. लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकणाचे सचिव गिरीजेश ग. कांबळे यांनी नियोजन केले. या लोकअदालतवेळी पक्षकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.