डॉ.आर.के पाटील यांचा कर्नाटक राज्यस्तरीय गडीनाडू चेतना पुरस्काराने सन्मान

0
24
संख : कर्नाटक महोत्सव -५० निमित्त गडीनाडू  प्रदेश अभिवृद्धी प्राधिकार व कर्नाटक राज्य कन्नड संस्कृतिक विभाग जिल्हा प्रशासन विजयपूर जिल्हा आणि महाराष्ट्रतील सर्व कन्नड शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुड्डापूर येथे कर्नाटक महोत्सव -५० व गडीनाडू  चेतना  राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

 

विकास प्राधिकरण कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गुड्डापूर दानम्मा देवी क्षेत्र येथे सोमवारी आयोजित कर्नाटक महोत्सव – 50 सोहळ्यात डॉ.जयदेवी ताई लिगाडे, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या वतीने पुरस्कार डॉ.आर.के पाटील सर यांना वितरण सोहळा आणि सीमा कन्नडिगांची परिषद झाली.संख येथील डॉ.आर.के.पाटील सर यांच्या श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था, संखला जयदेवी ताई लिगाडे गडीनाडू चेतना पुरस्कार श्री शिवराज एस तंगडगी समाज कल्याण आणि कन्नड व संस्कृतिक मंत्री कर्नाटक राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्यावेळी मंत्री श्री शिवानंद पाटील साखर व कृषी पणन, वस्त्रोउद्योग मंत्री कर्नाटक राज्य उपस्थित होते हलमिडी शिलालेखाचे स्मृतीचिन्ह, व  प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

 

डॉ.आर.के.पाटील सर यांचे जत तालुक्यात कन्नड भाषा संवर्धन व अभिवृद्धी कार्यासाठी कर्नाटक शासन यांनी राज्यस्तरीय गडीनाडू चेतना  पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे संख परिसरातील नागरिक, पालक यांच्याकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
डॉ.आर.के.पाटील सर यांना राज्यस्तरीय गडीनाडू चेतना पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था, संखचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका प्राचार्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी,श्री गुरुबसव विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, संख,पालक व सर्व ग्रामस्थाकडून  अभिनंदन होत आहे.
डॉ.आर.के.पाटील यांचा कर्नाटक राज्यस्तरीय गडीनाडू चेतना पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here