लाभार्थी सन्मान यात्रा सरकारच्या लोकोउपयोगी कार्याची पोहचपावती ! !

0
40
जत : महायुती सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी जत तालुक्यातील विविध गावांमध्ये लाभार्थी सन्मान यात्रा अंतर्गत विशेष जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत महायुती सरकारने नागरिकांच्या हितासाठी राबवलेल्या लाडकी बहीण योजना, किसान सन्मान योजना, वयोश्री योजना, कामगार योजना, वीजबील माफ योजना, जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मणगौडा रवीपाटील यांनी काढलेल्या महत्वपूर्ण जनकल्याण संवाद पदयात्रा योजना  यांसह विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. याशिवाय अनेक महत्त्वाच्या सरकारी योजनांची नोंदणी देखील केली जाईल.
यात्रेत आकर्षक कार्यक्रमांचा समावेश
या यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे मॅजिक शो, विविध खेळ, मेंदी कला, चहावर चर्चा आणि मोठमोठ्या एलईडी स्क्रीनवर फिल्म स्क्रीनिंग.या मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना आनंद मिळवून देताना सरकारी योजनांची महत्त्वपूर्ण माहिती देखील देण्यात येईल. एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार केला जाईल, ज्यामुळे लाभार्थींना त्याचा अधिकाधिक फायदा होईल.
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित
या यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना या योजनांबद्दल सविस्तर माहिती मिळेल, तसेच लाभार्थींनी थेट नोंदणीही करू शकतील. विशेषत: महिलांसाठी आणि युवकांसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. यात्रेतून नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि अनुभव ऐकून त्यांची बाईट्स घेऊन एक बातमी तयार केली जाईल.
एलईडीद्वारे सरकारी योजनांचा प्रचार
या यात्रेतील आणखी एक विशेष बाब म्हणजे मोठ्या एलईडी स्क्रीनवरून थेट सरकारी योजनांची माहिती देणे. विविध योजनांचा आढावा, पात्रता, लाभ आणि नोंदणी प्रक्रिया याबद्दलची माहिती एलईडी स्क्रीनवर दाखवली जाईल. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सहजपणे योजनांची माहिती मिळेल.या यात्रेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात असून, महायुती सरकारच्या जनहिताच्या योजनांचा अधिकाधिक फायदा घेण्याचे आवाहन भाजपा नेते बसवराज पाटील यांनी केले.
यावेळी भाजपाचे जेष्ठ  नेते रामण्णा जीवण्णवर, चेअरमन बसगोंडा जाबगोंड, रामण्णा भविकट्टी, नागनगौडा पाटील, गुरुबसू कायपूरे, पिरु कोळी, श्रीशैल कोटगोंड, सुरेश चव्हाण,आण्णाप्पा गडीकर,राजेंद्र पोतदार,रामण्णा माळी हे उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here