पत्नी बाहेर जाताच पोटच्या मुलीवर केला अत्याचार | बापावर गुन्हा

0
20

दारुड्‌या बापाने सख्ख्या १४ वर्षीय मुलीला जीवे मारण्याची देऊन बाळ जबरी शारीरिक संबंधच्चा स्थाक्ति केले. गेल्या तीन महिन्यांपासून ती मुलगी बापाचा लैंगिक अत्याचार सहन करीत होती. शेवटी आईला प्रकार सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरुन बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी किसन (बदललेले नाव) हा बेरोजगार असून पत्नी, मुलगी आणि मुलासह लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो गेल्या चार वर्षांपासून बेरोजगार असून त्याला दारुचे व्यसन आहे. किसन कामाला जात नसल्यामुळे पत्नी घराबाहेर पडली. ती खासगी काम करुन संसाराचा गाडा हाकते. मुलगी १४ वर्षाची असून ती नवव्या वर्गात तर मुलगा पाचवीत आहे.

सख्ख्या मुलीवर वाईट नजर, अश्लील चाळे
दारुड्या किसनाची गेल्या काही दिवसांपासून आपल्या सख्ख्या मुलीवर वाईट नजर होती. गेल्या तीन महिन्यांपासून तो तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. तू आता मोठी झाली आहेस, म्हणून मी तुझा लाड करीत आहे, असे सांगून तो तो वारंवार तिच्याशी लगट करीत होता. मुलीने बापाच्या या घाणरेड्या कृत्याकडे दुर्लक्ष केले.
मध्यरात्रीनंतर अत्याचार
गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी नातेवाईकाकडे धार्मिक समारंभासाठी गेली असताना मध्यरात्रीनंतर झोपेत असलेल्या मुलीशी बापाने अश्लील कृत्य केले. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने नकार दिला. त्यामुळे तिला बापाने मारहाण केली. त्यानंतर बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आईला जीवे मारण्याची धमकी देऊन गैरकृत्य
पत्नी कामावर गेल्यानंतर किसन हा मुलाला खेळायला बाहेर पाठवायचा. त्यानंतर मुलीला शारीरिक संबंधाची मागणी करायचा. ती अनेकदा त्याला नकार द्यायची. त्यानंतर तो शिक्षण बंद करण्याची धमकी द्यायचा. तसेच आईला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी घाबरुन त्याला संबंधासाठी होकार द्यायची. शिक्षण बंद आणि आईच्या जीवाला धोका असल्यामुळे झालेला प्रकार ती आईला सांगत नव्हती.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here